पिंपरी : बारा लाखांचा मैत्रिणीला गंडा | पुढारी

पिंपरी : बारा लाखांचा मैत्रिणीला गंडा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मैत्रिणीचे बारा लाख रुपये किमतीचे दागिने परस्पर सोनाराकडे गहाण ठेवले होते. दरम्यान, मैत्रिणीने दागिने माघारी मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देत तिची फसवणूक केली.

ही घटना एप्रिल 2020 ते जून 2021 दरम्यान आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी सीमा रामचंद्र ठोंबरे (35, आकुर्डी) यांनी सोमवारी (दि. 18) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

केवळ तीस सेकंदांतच होणार जमिनीची मोजणी 

त्यानुसार, आरती बालाजी शिवणे (34, रा. आकुर्डी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी महिला या दोघी मैत्रिणी आहेत.

फिर्यादी यांनी त्यांचे बारा लाख रुपये किमतीचे दागिने आरोपीकडे ठेवण्यास दिले होते. दरम्यान, आरोपी महिलेने मैत्रिणीला न विचारता ते दागिने परस्पर सोनाराकडे गहाण ठेऊन नऊ लाख 10 हजार रुपये घेतले.

नवी दिल्ली : जहांगीरपुरीतील ‘बुलडोजर’ कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी

याबाबत माहिती मिळताच फिर्यादी यांनी महिलेकडे सोनाराकडून दागिने सोडवून देण्याची मागणी केली. मात्र, आरोपी महिलेने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तपास उपनिरीक्षक झंझाड करीत आहेत.

Back to top button