चिखली : नऊ वर्षाच्या चिमुरड्याचा खून | पुढारी

चिखली : नऊ वर्षाच्या चिमुरड्याचा खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दगडाने ठेचून एका नऊ वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. ही घटना चिखली येथे रविवार (दि. 17) रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रॉयल एनफिल्डच्या ‘या’ नव्या बाईकचं आकर्षण; काय खास आहे त्यात

लक्ष्मण देवासी (वय 9, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी याचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आला.

राहुल गांधींनी पुन्हा परदेशात मारली कलटी

दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. तो मूळचा राजस्थान येथील आहे. या घटनेमुळे चिखली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Back to top button