पिंपरी : चिखली येथे दगडाने ठेचून ९ वर्षाच्या मुलाचा खून | पुढारी

पिंपरी : चिखली येथे दगडाने ठेचून ९ वर्षाच्या मुलाचा खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दगडाने ठेचून एका ९ वर्षाच्या मुलाचा खून करण्यात आला. ही घटना चिखली येथे रविवार (दि. १७) रात्री साडेआठ च्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण देवासी (वय ९, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी याचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. तो मूळचा राजस्थान येथील आहे. या घटनेमुळे चिखली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button