पुणे सहकार विभाग : अखेर जम्बो बदल्यांचे आदेश | पुढारी

पुणे सहकार विभाग : अखेर जम्बो बदल्यांचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे सहकार विभाग : येथील जम्बो बदल्यांचे आदेश  मंत्रालय स्तरावरुन शुक्रवारी जारी झाले आहेत. सहकार विभागात जंबो बदल्यांचे आदेश मंत्रालयाने ज्या-त्या विभागाला दिले आहेत.

सहकार आयुक्तालय, साखर आयुक्तालय आणि पणन संचालनालयात कार्यरत काही अधिकार्‍यांना आहे त्या पदावर अथवा आहे त्याच कार्यालयात बदली करण्याचे पेव यंदा फुटले आहे. काही अधिकार्‍यांना पुन्हा- पुन्हा त्याच पदावर मुदतवाढ देण्याचा नव्या ट्रेंडने सहकारात शिरकाव केल्याचेही दिसून येत आहे.

अधिक वाचा 

सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (तपासणी व निवडणूक) एन. पी. येगलेवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आर. एम. भुसारी यांची सध्याच्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई येथील विभागीय सहनिबंधक (दुग्ध) बी. एल. जाधव हे ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्‍यांना सेवानिवृत्तीपर्यंत तर पुण्यातील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक एम. व्ही. आकरे यांना त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

साखर आयुक्तालयातील सह संचालक (अर्थ) एम. बी. तिटकारे यांची याच कार्यालयात सह संचालक (प्रशासन) या पदावर तर या पदावरील आर. पी. सुरवसे यांच्या तिटकारे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर बदली झाली आहे. म्हणजे, कार्यालयातंर्गत ही बदली झाली आहे.

मुख्यालयातील अधिकार्‍यांची बसकन कायम…

सहकार आयुक्तांच्या अधिनस्त व प्रति नियुक्तीवर साखर व पणन विभागात कार्यरत कनिष्ठ लिपिक ते स्वीय सहाय्यक पदावरील बदल्यांमध्ये काही अधिकार्‍यांना तर तहहयात त्याच पदावरुन सेवानिवृत्त होण्याचा चंग बांधल्याचे पुन्हा एकदा समोर आली आहे.

सहकार मंत्री, सहकार राज्यमंत्री, सहकार सचिव आणि सहकार आयुक्त कोणीही असो, आम्ही पद आणि खुर्चीवर मारलेली ‘बसकन’ कोणीच हटवू शकत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अन्य कार्यालयातील अधिकारी त्या पदावर येण्यास इच्छुक असूनही त्यांना सहकार आयुक्तालयाबाहेरील प्रति नियुक्तीने होणार्‍या नियुक्त ठिकाणी काम करावे लागत आहे. त्यामुळे आयुक्तालयातील ‘सुप्रिमों’ना हटविण्यात पुन्हा एकदा अपयश आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भंडारा, लातूरच्‍या  जिल्हा उपनिबंधकांना मुदतवाढ

भंडारा जिल्हा उपनिबंधक एम. एम. देशकर आणि लातूर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांना आहे त्याच पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे येथील दुग्ध उपनिबंधक एस. यु. शिरापुरकर यांची उस्मानाबाद जिल्हा उपनिबंधकपदी बदली करण्यात आली आहे.

नागपूर जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांची अमरावती विभागीय उपनिबंधक येथे जे. एल. इटेवाड यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर बदली झाली आहे.

उपनिबंधक पदावरील बदल्या

औरंगाबाद येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक जे. बी. गुट्टे यांची औरंगाबाद येथेच वस्त्रोद्योगच्या प्रादेशिक उपायुक्तपदी,  जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील विशेष कार्य अधिकारी डी. एम. पालोदकर यांची गुट्टे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर, नागपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अजय कडू यांची अमरावती विभागीय उपनिबंधक कार्यालयात बदली झाली आहे.

उपनिबंधक -म्हाडा मुंबई येथील बजरंग जाधव यांची एच/वेस्ट विभाग मुंबई येथील उपनिबंधक पदी, पुणे येथील उपनिबंधक आर. आर. महाजन यांची पणन मंडळातील पुणे विभागाचे उपसरव्यवस्थापक प्रशांत सूर्यवंशी यांच्या संभाव्य बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर बदली झाली आहे.

अधिक वाचा 

नागपूर येथील वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त एस. एल. भोसले यांची वर्धा जिल्हा उपनिबंधकपदी गौतम वालदे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर बदली झाली आहे.

अमरावती विभागीय उपनिबंधक जे. एल. इटेवाड यांची कोकण विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पदावर बदली झाली आहे.

सहकार आयुक्तालयातील उपनिंधक डी.बी. उढाण यांची सध्याच्या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई उपनिबंधक जी/एन विभागाचे उपनिबंधक सचिन घोडके यांची मालेगाव उपनिबंधकपदी, पणन उपसंचालक ज्योती शंखपाल यांची पुणे येथील महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातील उपनिबंधकाच्या रिक्त पदी बदली झाली आहे.

सहकार आयुक्तालयातील माहिती व तंत्रज्ञान कक्षाच्या उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांची औरंगाबाद विभागीय उपनिबंधक येथे रिक्तपदी, नांदेड येथील प्रादेशिक साखर उपसंचालक बी. एल. वांगे यांची राज्य कृषी पणन मंडळाच्या लातूर विभागाचे राजेंद्र वीर यांच्या संभाव्य बदलीने रिक्त होणार्‍या उपसरव्यवस्थापकपदी, नागपूर शहर १ च्या उपनिबंधक सीमा पांडे यांची नागपूर प्रादेशिक वस्त्रोद्योग उपायुक्त एस. एल. भोसले यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर, पुणे शहर-६ चे उपनिबंधक यू. के. माळशिकारे यांची सहकार आयुक्तालयात उपनिबंधकपदी बदली झाली आहे.

मुंबई बाजार समितीचे उपनिबंधक-उपसचिव सुनिल सिंगतकर यांची नागपूर शहर-३ च्या रिक्त उपनिबंधकपदी, कोल्हापूर येथील जिल्हा विशेष लेखापरिक्षक डी. बी. बोराडे यांची कोल्हापूर येथील रिक्त असलेल्या द्वितीय विशेष लेखापरिक्षक (साखर) येथे तर मुंबईचे वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उपायुक्त एस. एम. तांबे यांची रिक्त असलेल्या चंद्रपूर जिल्हा उपनिबंधकपदी बदली झाली आहे.

लेखापरिक्षक बदल्या

अहमदनगर येथील तृतीय विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ चे (साखर) बी. के. बेंद्रे यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

पालघरचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक एन. पी. दाणेज यांची ठाणे येथील एस.के. उईके यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, उईके यांची सहकार आयुक्तालयातील विशेष लेखापरिक्षक बी. एस. बडाख यांच्या बदलीने रिक्त जागी, तर बडाख यांची पुणे येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयातील रिक्त विशेष लेखापरिक्षकपदी (फिरते पथक) बदली झाली आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनवरील प्रतिनियुक्तीने नियुक्त विशेल लेखापरिक्षक वर्ग१चे डी. एस. चिंचोलीकर यांची सिंधुदुर्ग येथील रिक्त असलेल्या जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, सांगली जिल्हा विशेष लेखापरिक्षक किरण पाटील यांची कोल्हापूर येथील डी. बी. बोराडे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर प्रतिनियुक्तीने असलेले विशेष लेखापरिक्षक ए. वाय. देसाई यांची सातारा येथील रिक्त असलेल्या द्वितीय विशेष लेखा परिक्षकपदी (साखर) तर सोलापूर द्वितीय विशेष लेखापरिक्षक (साखर) बी. यु. भोसले यांना सध्याच्याच पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

अधिक वाचा 

नाशिकचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक डी. एन. काळे यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.

बीडचे जिल्हा विशेष लेखापरिक्षक बी. एस. फासे यांची उस्मानाबाद येथील रिक्त जिल्हा विशेष लेखापरिक्षकपदी, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मुंबई येथील विशेष लेखा परिक्षक व्ही. आर. सवडे यांना सध्याच्या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील उपसहकार निवडणूक आयुक्त एस. आर. नाईकवाडी यांना सध्याच्या पदावर एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूर शहर २ चे उपनिबंधक एस. एन. कौसडीकर यांची नागपूर येथे सीमा पांडे यांच्या बदलीने रिक्त जागी बदली झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button