पुणे : गॅस लीकेजमुळे गेल्या पाच वर्षांत 584 दुर्घटनांची नोंद | पुढारी

पुणे : गॅस लीकेजमुळे गेल्या पाच वर्षांत 584 दुर्घटनांची नोंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरात उन्हाचा तडाखा वाढत असताना आगीच्या घटना वाढत आहेत. कात्रज येथे अवैधरीत्या भरल्या जात असलेल्या सिलिंडरचा मंगळवारी सायंकाळी स्फोट झाला. घरातील सिलिंडर लीक होण्याच्या दुर्घटनाही सतत घडत आहेत. पाच वर्षांत शहरात अशा प्रकारच्या गॅस लीकेजच्या तब्बल 584 घटनांमध्ये अग्निशमन दलाने वर्दी बजावली आहे.

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

कात्रज परिसरात मंगळवारी सायंकाळी एकाच वेळी 22 सिलिंडर स्फोट झाल्याने शहर हादरले. घरगुती गॅस लीक होऊन घडलेल्या दुर्घटनांचे प्रमाण अधिक आहे. अशा घटना घडू नये व घडल्यानंतर काय काळजी घ्यावी? या विषयी माहिती असल्याने बर्‍याच घटनांमध्ये अग्निशमन दलाला बोलावण्याची गरज पडलेली नाही.

नाशिकरोड करन्सी नोट प्रेस च्या आवारात भीषण आग

गॅस लीक संदर्भात केवळ ६३ तक्रारी

पाच वर्षांत 584 घटना घडल्या असल्या तरी मागील वर्षात गॅस लीकसंदर्भातील केवळ 63 तक्रारी अग्निशमन दलाला मिळाल्या. तर चालू वर्षातील जानेवारी एलपीजी गॅस लीकच्या 4 तर फेब्रुवारी महिन्यात एलपीजी गॅस लीकच्या 5 घटनांत अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. दोन वर्षांत एमएनजीएल व सीएनजीसंदर्भातील दुर्घटनेत 52 वर्दी अग्निशमन दलाला मिळाल्या. यामध्ये मागील वर्षात यासंबंधी 19 ठिकाणी, तर 2020 मध्ये 33 ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

रशिया- युक्रेन युद्ध : कुटनितीमुळे भारताचा वाढला जगात दबदबा; अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्‍यावर

धनकवडीतदेखील स्फोट होऊन झाले होते तिघे जखमी

गेल्या पंधरवड्यात धनकवडी परिसरातदेखील विनापरवाना घरात साठा करून ठेवलेल्या टाक्यांतून गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात तिघे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला आहे. 16 मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास धनकवडीतील मस्के चाळीत ही घटना घडली.

पुढील ईडीची धाड माझ्यावर असेल, स्वागतासाठी तयार : नाना पटोले

मंगूसिंग हा मूळचा राजस्थानचा असून, गॅसच्या टाक्या वाहतुकीचे काम करतो. त्याने घरामध्ये व्यावसायिक गॅसच्या टाक्यांचा साठा करून ठेवला होता. 16 मार्चला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंगूसिंगची पत्नी मनोहरकुंवर स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटवत होती. त्यामुळे गॅसगळती होऊन मोठा स्फोट झाल्यामुळे त्यांच्या साडीने पेट घेतला. त्यामुळे मंगूसिंग आणि बबलूसिंग आग विझविण्यासाठी गेले असता दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मंगूसिंग याने घरात एवढ्या मोठ्या प्रमाणत गॅसच्या टाक्यांचा साठा केल्याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.

Back to top button