उन्हाच्या तीव्रतेने पिंपरीतील नागरिक हैराण | पुढारी

उन्हाच्या तीव्रतेने पिंपरीतील नागरिक हैराण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढू लागला आहे. भर दुपारी उन्हात येणार्‍या – जाणार्‍यांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने सामान्य नागरिक हैराण झाले आहे.

शहरात आज (बुधवारी) 40. 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाढत्या उन्हाचा चटका सकाळी नऊ वाजल्यापासूनच जाणवत आहे.

नाशिक : अन् मंत्री छगन भुजबळ धावले मदतीला

त्यामुळे दुपारी 12 ते 4 यावेळेत बाहेर पडणार्‍या नागरिकांना उन्हामुळे बैचेनी निर्माण होत आहे. दिवसेंदिवस वाढणार्‍या तापमानामुळे नागरिकांना सूर्य खवळल्यासारखे वाटत आहे.

दुपारनंतर रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र असून याचा परिणाम व्यावसायिकांवरही झाल्याचे दिसून येत आहे. वाहनांवर जाणार्‍या तुरळक व्यक्ती दिसत होत्या. बाजारपेठ व बसस्थानकासह शासकीय कार्यालयांतही उन्हाच्या वेळी गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Body Shaming : हरनाज संधूने रॅम्पवर पाऊल ठेवताच सुरू झाल्या चर्चा

उष्णतेचा परिणाम प्राणीमात्रांवरही होत आहे. जनावरे, कुत्री, मांजरीही झाडांची सावली, पाण्याच्या ठिकाणी किंवा ओलसर जागेचा विसावा घेऊन उन्हापासून बचाव करत आहेत. पुढचे दोन दिवस तापमान 40 ते 42 अंश इतके राहणार असा अंदाज वेधशाळेकडून वर्तविला जात आहे.

ऊन वाढू लागल्याने फळांचा रस, उसाचा रस, ताक विक्री करणार्‍यांची छोटीछोटी दुकाने दिसू लागली आहेत. दिवसभर उन्हात फिरणारी मंडळी फळांचा रस, ताक किंवा बर्फाचे गोळे खाणे पसंत करत आहेत.

सोनिया गांधी यांच्या ‘मनरेगा’ प्रश्नावरून लोकसभेत गदारोळ

ऊन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी आवर्जून घातली जात आहे. उन्हाळ्यात आजारी पडणार्‍यांची संख्याही वाढल्याचे दिसते.
रात्रीही भयंकर उकाडा जाणवत आहे.

उन्हाळ्यात फॅन लावून मिळणारा थंडावाही दमट वातावरणामुळे जाणवत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळीही उकाड्याने नागरिक घामाघूम होत आहेत.

Back to top button