बारामती : सुप्यात बॅंक अधिकाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

बारामती : सुप्यात बॅंक अधिकाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा

मार्चअखेर असल्याने थकीत कर्जाची नोटीस बजावल्याच्या कारणावरून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सुपे (ता. बारामती) येथील वरिष्ठ अधिकाऱ्यायाला बॅंकेतच मारहाण करण्याचा प्रकार मंगळवारी (दि. २९) ) दुपारी बॅंकेच्या शाखेत घडला. अभिनय उर्फ काका कुतवळ यांच्या विरोधात पोलिसांनी याप्रकरणी गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दत्तात्रय पाडूंरंग कदम (रा. माळेगाव बुद्रूक, ता. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली.

Petrol Diesel Prices : १० दिवसांत नवव्यांदा इंधन दरात वाढ, मुंबईत डिझेलचे शतक

कदम यांनी कुतवळ यांचे नातलग सागर अरविंद कुतवळ (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) यांना सोनेतारण थकीत कर्ज प्रकरणी २९ रोजी नोटीस बजावण्यासाठी मोरगाव येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना त्यांना कुतवळ यांनी फोन करत काहीही कारण नसताना शिविगाळ केली. तुम्ही शिविगाळ का करता अशी विचारणा फिर्यादीने केली असताना त्यांनी तु बॅंकेत ये, तुझ्याकडे बघतो असे म्हणत फोन ठेवून दिला.

नाना पटोलेंना धक्का, नागपूरचे प्रसिद्ध वकील सतीश उकेंना ईडीनं घेतलं ताब्यात

दुपारी १ वाजेच्या सुमारास फिर्यादी बॅंकेत आले. त्यांनी कर्ज विभागात काम करून अकाऊंट विभागात ते जात असताना सव्वा वाजण्याच्या सुमारास कुतवळ हे तेथे आले. त्यांनी काही एक न विचारता शिविगाळ केली. हाताने मारहाण करत हाताची बोटे पिरगाळत खुर्चीवर ढकलून दिले. फिर्यादी खाली पडल्यानंतर खुर्चीने मारहाण सुरु केली. त्यात फिर्यादीच्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली. बॅंकेतील कर्मचारी हनुमंत किसन भगत, सुरेश रामचंद्र गायकवाड यांनी भांडण सोडवले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांना कल्पना दिली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचाराची यादी दिली. त्यानुसार होळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली.

हेही वाचा

रशिया- युक्रेन युद्ध : कुटनितीमुळे भारताचा वाढला जगात दबदबा; अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री भारत दौर्‍यावर

Satish Uke : गडकरी आणि फडणवीसांवर याचिका दाखल करणारे कोण आहेत सतीश उके?

SERGIY STAKHOVSKY : विम्बल्डन विजेता सर्गेईची युक्रेनच्या रस्त्यावर गस्त

Back to top button