भय इथले संपत नाही...! | पुढारी

भय इथले संपत नाही...!

पिंपरी : संतोष शिंदे : पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे शहरात यंदा तरी शांतता नांदेल, अशी पिंपरी- चिंचवडकरांना आशा होती. मात्र, पहिल्या दोन महिन्यांतच डझनभर खून झाले आहेत.

याशिवाय 54 जणांची लूटमार, 25 बलात्कार आणि 15 जणांच्या गळ्यातील चेन ओरबाडल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. तसेच, नंग्या तलवारींचा नाच करीत 17 ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भय इथले संपत नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटू लागल्या आहेत.

शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी- चिंचवड या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.

आजपासून थेट हेलिकॉप्टरनेच करा अष्टविनायक दर्शन !

त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पोलिसांची वर्दळ वाढली. परिणामी शहरात काही सकारात्मक बदल झाले. गुन्हेगारी विश्वात दबदबा असणार्‍या शहरातील कुप्रसिद्ध टोळ्या अंडरग्राऊंड झाल्या.

गुन्हे शाखेची युनिट वाढल्याने गुन्हेगारांवर ‘वॉच’ वाढला. त्यामुळे नामचीन गुंडांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. एकीकडे टोळ्या जरी शांत झाल्या असल्या तरीही स्ट्रीट क्राईमसह शहरातील कायदा व सुव्यव्यस्था अबाधित राखण्यात पोलिसांना अजूनही म्हणावे, असे यश मिळत नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरने अनेक अडचणी सुटणार !

‘त्या’ घटनांमुळे उलटसुलट चर्चा

निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच तडीपार गुन्हेगारांनी एकत्र येऊन तोडफोड केली. या घटनेची दखल पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली.

त्यानंतर लगेचच पिंपरी कॅम्प येथे चप्पल खरेदीचे पैसे मागितल्याने एका टोळक्याने दुकानात घुसून व्यापार्‍यावर वार केले. या दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन त्याचे फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Viral Video : शाळकरी चिमुकलीचा डान्स पाहून नेटकरी झाले ‘सैराट’ !

‘बेसिक’ पोलिसिंग होत नसल्याचा आरोप

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून विविध संकल्पना अंमलात आणल्या जात आहे. झोपडपट्टी परिसरातील तरुणांना आणि तृतीयपंथीयांना रोजगार मिळवून देणे, अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करणे, हा देखील याचाच एक भाग आहे.

मात्र, अलीकडे शहरातील रस्त्यांवर पोलिसांचा वावर तुलनेने कमी झाला आहे. रात्रीची गस्तही होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. एकंदरीतच शहरात मोठ्या उपाययोजना राबवण्यापेक्षा ‘बेसिक’ पोलिसिंग आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात.

रत्नागिरी : रिफायनरीविरोधात राजापूर तहसीलवर भव्य मोर्चा

गुन्हेगारी नाही, गुन्हे वाढले

शहरात यापूर्वी ‘बर्किंग’ म्हणजेच गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते. मात्र, पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आदेशानुसार नागरिकांच्या तक्रारींवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा आकडा काही प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गुन्हे दाखल करून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे, हा यामागचा उद्देश समजून घेतला पाहिजे.
– मनीष कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी- चिंचवड.

Back to top button