Deputy cm ajit pawar : पवारांनी सकाळी कार्यक्रम घेण्याचे रहस्य उलघडले - पुढारी

Deputy cm ajit pawar : पवारांनी सकाळी कार्यक्रम घेण्याचे रहस्य उलघडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm ajit pawar) नेहमी सकाळी कार्यक्रम का घेतात, हा प्रश्न पुणेकरांना नेहमीच पडतो. त्याचे रहस्य अजित पवार (Deputy cm ajit pawar) यांनी आज पहिल्या पुणे मेट्रोच्या चाचणीला हिरवा कंदिल दाखविण्याच्या कार्यक्रमात उलघडले.

पवार म्हणाले, सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास आम्ही कार्यक्रम घेण्याचे नियोजन करत असतो.

मागील एका कार्यक्रमात पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली. त्यावेळी आयोजकांवर गुन्हे दाखल झाले.

आजही तशीच स्थिती नको, यासाठी हा कार्यक्रम सकाळी घेतला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

पुणे हद्दीतील पहिल्या मेट्रो ट्रेनची (pune metro) शुक्रवारी आज (दि.३०) सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पहिली ट्रायल रन घेण्यात आली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

मेट्रोची ही ट्रायल रन कोथरूड येथील (हिल व्ह्यूव पार्क कारशेड) वनाज येथून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या आयडियल कॉलनीपर्यंत झाली.

यावेळी उपस्थित पुणेकर मेट्रो (pune metro) धावण्याच्या पहिल्या टप्प्यातील मौल्यवान क्षणांचे साक्षीदार झाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

अजित पवार यांनी मेट्रोच्या या विकास कामाला कधीही निधीचा तुटवडा भासू देणार नसल्याची ग्वाही दिली.

मेट्रो प्रकल्पाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोची कामे प्रगतिपथावर आहेत.

यातील पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रोची चाचणी एका वर्षांपूर्वी घेण्यात आली.

हे ही पाहा :

Back to top button