राजगुरुनगर : भजी तळून न दिल्याने पोटच्या मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर : घरात तेल नसताना भजी बनवून दिली नाहीत म्हणून बापाने पोटच्या मुलीला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. खरपुडी (ता खेड ) येथे गुरुवारी (दि २९) घडली. या घटनेत १९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.

मुलगीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत जखमी मुलीची आई व आरोपी वडिलांची पत्नी निर्मला राजाराम गायकवाड हिने खेड पोलिस ठाण्यात पती राजाराम गायकवाड विरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर पती फरार झाला आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड यांच्या राहत्या घरात वडील राजाराम गायकवाडने १९ वर्षीय मुलीला भजी करण्यास सांगितले.

मात्र घरात तेल नसल्याने वडिलांना भजी करुन देता आली नाही. त्याचा राग मनात धरुन राजाराम गायकवाडने तिला विटेने डोक्यात मारुन काठीने दोन्ही हातावर व हाताच्या बोटावर मारुन गंभीर दुखापत केली.

या घटनेनंतर पत्नीने पती विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर गायकवाड फरार झाला आहे.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन गिलबिले पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button