नो-पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केल्यास दंड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी वाहतूक पोलीस सरसावले आहेत. नो- पार्किंगच्या वाहने उचलण्यासाठी टोईंग व्हॅनसह सज्ज करण्यात आली आहे.
शुक्रवार (दि. 25) पासून नो- पार्किंगमध्ये दुचाकी उभी केल्यास वाहनमालकांकडून जीएसटीसह तब्बल 736 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
किरीट सोमय्या मुरुडला आल्यास,आम्ही रस्तावर उतरु; पर्यटन व्यावसायिकांचा इशारा !
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवर पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, ठिकाणी ‘पे अँड पार्क’ देखील सुरू करण्यात आले आहेत.
मात्र, बेशिस्त वाहन चालकांमुळे ‘पे अँड पार्क’ योजनेचा फज्जा उडाला आहे. ज्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कोंडी होत आहे. पोलिसांकडे टोइंग व्हॅन उपलब्ध नसल्याने कारवाई करण्यात मर्यादा येत होत्या.
Tata Harrier: टाटा हॅरिअरच्या नव्या व्हेरिएंट्स पाहिल्या का?, जाणून घ्या खास फिचर्स
मात्र, महापालिकेने नुकतेच वाहतूक पोलिसांना टोइंग व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे शुक्रवार (दि. 25) पासून कारवाईचा धडाका सुरु होणार आहे.
दुचाकीसाठी दंड
नो-पार्किंग – 500 रुपये
टोईंग चार्जेस- 200 रुपये
जीएसटी- 36 रुपये
एकूण- 736 रुपये