पुणे : पानशेत खोऱ्यातील वणव्यात वनसंपदा खाक | पुढारी

पुणे : पानशेत खोऱ्यातील वणव्यात वनसंपदा खाक

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा

सिंहगड – पश्चिम हवेलीपाठोपाठ वेल्हे तालुक्यातील पानशेत खोऱ्यातील जंगलांना लागलेल्या भीषण वणव्यात वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. वेल्हे तालुका वनपरिक्षेत्र विभागाने वणवे लावणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध वन अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वणवे लावणाऱ्या समाजकंटकांचा शोध सुरू आहे.

मुंबई बँक घाेटाळा : प्रवीण दरेकरांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

वन कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी

पुणे – पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथील जंगलात लागलेला वणवा विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. जोरदार वारे व कडक उन्हाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वणवा विझवला. त्यानंतर कर्मचारी पानशेत येथे पोहचले. त्यानंतर थोड्याच वेळात जंगलाच्या मध्यभागी पुन्हा वणवा पेटला. वेल्हे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लंगोटे, वनपरिमंडल अधिकारी श्याम भोकरे, गोकुळ बंडाळ, बंडू खरात, मनोज महाजन आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

Karnataka Hijab Controversy : हिजाब बंदी याेग्‍यच : कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचा निकाल

निगडे मोसे, ओसाडे, आंबेड, रुळे येथे वनखात्याच्या अखत्यारी मोठे वनक्षेत्र आहे. त्यात साग, निलगिरी, धुप आदी वृक्ष तसेच दुर्मिळ वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ससे, हरीण, मोर, काळवीट, बिबटे अशा वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. मात्र, निगडे, ओसाडे, आंबेड, रुळेपासून पानशेत परिसरातील जंगलांना गेल्या चार दिवसांत वणवे लागले. त्यात सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील वनसंपत्तीची मोठी हानी झाली. वन्यपक्षी, प्राण्यांचीही यात हानी झाली.

वक्फ बोर्डावर दाऊदच्या माणसांची नियुक्ती; फडणवीस यांचा विधानसभेत दुसरा पेनड्राईव्ह बॉम्ब

पानशेत वनविभागाचे वनरक्षक बंडू खरात म्हणाले, रुळे गावच्या भोपळीचा वाडा जंगलात वणवा सुरू झाला. तेथील वणवा शीवेवरील ओसाडे, सोनापूर, निगडे आंबेड गावातील जंगलात पसरला. ओसाडे येथील वणवा विझवला. मात्र, काही समाजकंटकांनी पुन्हा वणवा लावला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Panjab News : आंतरराष्ट्रीय कब्बडीपटू संदीप नांगलची गोळ्या झाडून हत्या (Video)

चारा, खाद्य नष्ट

सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. घनदाट जंगलात वन्यजीव तसेच गाई, बैल अशा जनावरांना मुबलक प्रमाणात चारा, खाद्य तसेच कडे-कपाऱ्यात पाणी मिळत होते. वणव्यात खाद्य, चारा व पाणी नष्ट झाले.

समाजकंटकांकडून वणवे

जंगलात फिरण्यासाठी येणारे तसेच रानावनात जाणारे काही समाजकंटक जंगलाना वणवे लावून पसार होत आहेत, असे वनखात्याचे म्हणणे आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे डोंगरकड्याच्या भागात वणवे लागत आहेत.

कोल्हापूर : ‘महावितरण’च्या कार्यालयातच शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Back to top button