मावळ : बबनराव भेगडे यांचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

मावळ : बबनराव भेगडे यांचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा
Published on
Updated on

वडगाव मावळ, पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव  भेगडे  (Babanrao Bhegade) यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे दिला. दरम्यान पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेनुसार आठवडाभरात नवीन तालुकाध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतनंतर गेल्या २२ वर्षाच्या कालावधीत भेगडे यांनी तब्बल १३ वर्षे तालुकाध्यक्ष  म्हणून काम केले असून यातील सुमार ११ वर्षे पक्षाचा आमदार नसताना पक्ष संघटना मजबूत ठेवण्याचे काम केले आहे. आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळावी, म्हणून  भेगडे यांनी राजीनामा दिला आहे.

भेगडे (Babanrao Bhegade) यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेली ४० वर्षांपासून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता म्हणून सक्रीय असून १३ वर्षात ४ वेळा तालुकाध्यक्ष म्हणून निष्ठेने प्रामाणिकपणे सर्व घटकांना बरोबर घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिल्हा  बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी काम करण्याची संधी दिली.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत  कार्यकर्त्यांनी मनापासून एकोप्याने काम केले. व पक्षाला विजय मिळवून देण्यात यश आले, गेल्या दोन वर्षांत आमदार सुनिल शेळके यांच्यामुळे पक्षाला भरभराटीचे दिवस आले आहेत. नवीन कार्यकर्त्यांना पक्षामध्ये कार्य करण्याची संधी मिळावी. म्हणून व ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे भेगडे यांनी म्हटले आहे.
भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, सहकार क्षेत्रातील सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यासाठी पूर्वीच्या जोमाने पक्षाचा एकनिष्ठ सैनिक या नात्याने अखंड कार्यरत राहणार असल्याचे भेगडे यांनी  म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : "अजून खूप शिखरं गाठायचीयंत" – अमृता खानविलकर | Power Women | International Women's Day 2022

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news