सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगास सादर | पुढारी

सुनावणीचा अहवाल निवडणूक आयोगास सादर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्याबाबत तब्बल 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या. त्यावर राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासमोर शुक्रवारी (दि.25) सुनावणी झाली.

त्याचा अहवाल मंगळवारी (दि.2) राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम प्रभागरचनेची उत्सुकता लागली आहे.

ओबीसी आरक्षण : राज्‍य मागसवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने नाकारला

महापालिकेने प्रभागरचनेचा आराखडा 1 फेबु—वारीला प्रसिद्ध केला. त्यावर 14 फेबु—वारीपर्यंत सूचना व हरकती मागवून घेण्यात आल्या. त्यात विक्रमी संख्येने 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या.

वेदनादायी…. युक्रेनमधून १० लाखांहून अधिक नागरिक निर्वासित

त्यावर अनिल कवडे यांच्यासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी झाल्या. त्यांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात आला. आता प्रभागरचनेस अंतिम मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे.

आठवड्याभरात प्रभागरचनेला अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एससी, एसटी व महिला आरक्षणाची सोडत काढली
जाणार आहे.

Back to top button