प्रभाग २७ : कासेवाडीत रंगणार तिरंगी सामना | पुढारी

प्रभाग २७ : कासेवाडीत रंगणार तिरंगी सामना

समीर सय्यद

पुणे : नवीन प्रभाग क्रमांक 27 मध्ये (कासेवाडी-हरकानगर) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आघाडी झाली नाही, तर येथे या दोन पक्षांसोबत भाजप असा तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आघाडी झाल्यास जागा वाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

कँाग्रेससमोर आव्हान

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कासेवाडी व लगतच्या झोपडपट्टीच्या परिसरात गेल्यावेळी भाजपने खिंडार पाडले. या प्रभागात गेल्या निवडणुकीत (लोहियानगर-कासेवाडी) पक्षांतर्गत वादाचा परिणाम होऊन काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले. या जुन्या प्रभागातील 85 टक्के, तर लगतच्या प्रभाग 20 मधील (ताडीवाला रोड ससून हॉस्पिटल) 15 टक्के भाग मिळून नवीन प्रभाग 27 तयार झाला आहे. या प्रभागात झोपडपट्टीचा भाग असल्याने हातावर पोट भरणार्‍यांची संख्या मोठी आहे. कष्टकरी, कामगार, हमाल, रिक्षाचालक, टेम्पोचालक, घरकाम करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रभागातील विजयाचे गणित कष्टकरी व कामगार वर्गावरच अवलंबून आहे. त्यामुळे या मतदारांकडे इच्छुकांचे विशेष लक्ष आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लेकरांच्या सुटकेसाठी मोदी सरकारकडून हवाई दलास पाचारण

इच्छुकांची संख्या जास्त

प्रभाग 27 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपकडून विद्यमान नगरसेविका मनीषा लडकत, अर्चना पाटील, संदीप लडकत, तुषार पाटील, सुधीर जानजोत, सुखदेव अडगळे, मुन्वर खान, आशिष जानजोत, अ‍ॅड. राणी कांबळे आदी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख यांच्यासह जुबेर दिल्लीवाले, सुरेखा खंडागळे, विजय जाधव, विपुल उमंदे, माजी नगरसेवक बेबी युसूफ सय्यद आदी इच्छुक आहेत.

Russian invasion of Ukraine : रशियाचे ५,७१० सैनिक ठार, युक्रेनचा दावा

शिवसेनेकडून जावेद खान, भरती दामाजी, अनिल दामाजी, अमित जगताप, पद्मा सोरटे, जितेंद्र जठार, शंकर साठे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँगेसतर्फे जुबेर बाबू शेख, दिलशाद शेख, दत्ता जाधव, युसूफ शेख, शैलेंद्र जाधव, अतुल जाधव, किरण जगताप इच्छुक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भूपेश शेंडगे, संजय भोसले, शहीद खान, बबलू परदेशी, शैलेश चव्हाण, बाळू पवार, फराह खान इच्छुक आहेत, तर रिपब्लिकन ऑफ इंडियाकडून (आठवले) रोहित कांबळे, शशिकांत मोरे, सुनीता मोरे, डॉ. कपिल जगताप, लियाकत शेख, कल्याणी धांडोरे इच्छुक आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशिद शेख यांचा मुलगा शानुर शेख निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. वंचित विकास आघाडीकडून विनायक कांबळे इच्छुक आहेत.

पोटाला खाण्यासाठी बाहेर पडला आणि जीव गेला ! युक्रेनमध्ये कर्नाटकमधील विद्यार्थ्याचा करुण अंत

अशी आहे प्रभागरचना

कासेवाडी, हरकानगर, अग्रवाल कॉलनी, न्यू नानापेठ, सदर बाजार, भवानी पेठ, ससाणेवाडा, पूरग्रस्त कॉलनी, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, शांतीनगर सोसायटी, गुरुनानक नगर, चित्रगुप्त कॉलनी, पीएमसी कॉलनी, महात्मा फुले पेठ, कासेवाडी झोपडपट्टी, अशोकनगर कॉलनी, भवानी को. ऑप सोसायटी इत्यादी भाग समाविष्ट आहे.

  • एकूण मतदार : 68501
  • अनुसूचित जाती 16049

Back to top button