Pimpri-Chinchwad Municipal : महापौरांचा सांगवी प्रभागात सर्वांधिक चार सदस्य, उर्वरित ४५ प्रभागात तीन सदस्य | पुढारी

Pimpri-Chinchwad Municipal : महापौरांचा सांगवी प्रभागात सर्वांधिक चार सदस्य, उर्वरित ४५ प्रभागात तीन सदस्य

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात महापौर उषा ढोरे यांचा सांगवी प्रभाग क्रमांक ४६ हा सर्वांधिक चार सदस्य असलेला मोठा प्रभाग आहेत. तर, क्षेत्रफळानुसार तळवडे प्रभाग क्रमांक १ हा सर्वांत मोठा प्रभाग आहे. प्रभागांना मागील निवडणुकीप्रमाणे केवळ क्रमांक दिले आहेत. प्रभागरचना पाहण्यासाठी सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. (Pimpri-Chinchwad Municipal)

महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी (दि.१) सकाळी दहाला जाहीर करण्यात आला. महापालिका भवन व सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयात तसेच, महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in. या संकेतस्थळावर  प्रभागरचना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

प्रभागाचे नकाशे व त्यातील समाविष्ट भाग पाहण्यात नागरिक तसेच, इच्छुक दंग झाले होते. अपेक्षेनुसार प्रभाग असल्याने काहींनी आनंद व्यक्त केला तर, प्रभाग तुटल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.  प्रभागासोबत एससी व एसटीची लोकसंख्या दिल्याने कोणत्या प्रभागात त्या वर्गाचे आरक्षण पडणार हे स्पष्ट झाले. (Pimpri-Chinchwad Municipal)दरम्यान, महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचना पाहण्यास अनेकांनी पसंती दिली. एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळास भेट दिल्याने ती खूपच मंद सुरू होती. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. एकूण ४६ प्रभाग असून, त्यातील ४५ प्रभाग हे तीन सदस्यांचे व सांगवी प्रभाग क्रमांक ४६ हा चार सदस्यांचा प्रभाग आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button