जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शिलाटणे फाट्याजवळ भीषण अपघात ५ जागीच ठार

पुणे; पुढारी वृत्तसेवा

कुर्ला-मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आज (ता.३०) रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जात असलेल्या फोर्ड इकोस्पोर्ट गाडीचा (एचआर-२६-सीके-७८०५) कंटनेरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले.

अपघातग्रस्त कारवर पुण्याकडून येणाऱ्या कंटेनर (एमएच-४३-वाय-५१३०) धडकल्याने ५ जण जागीच ठार झाले. असून कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. मयतांची ओळख अजून पटलेली नाही. माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस व आयआरबी देवदूत पेट्रोलिंग घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे काही काळासाठी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Exit mobile version