नेरे येथे आढळली बिबट्याची तीन बछडे | पुढारी

नेरे येथे आढळली बिबट्याची तीन बछडे

हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : नेरे-सांगावडे हद्दीलगत असलेल्या तुकाई बांधार्‍याजवळील शेतात ऊस तोडणी करताना कामगारांना बिबट्यांची तीन बछडी आढळली आहेत.

वनडे सीरीज जिंकल्यानंतर द. आफ्रिकेच्या क्रिकेटरने केला ‘जय श्री राम’चा जय घोष!

शेतकरी राहुल जाधव आणि मोहन जाधव यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली. यानंतर वन अधिकारी व रेस्क्यू टीमने ही बछडी ताब्यात घेतली असून, वनपरीक्षेत्र कार्यालयात अधिकार्‍यांच्या देखरेखीत ठेवण्यात आली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार

बछडे अंदाजे 15 दिवस ते एक महिना वयाची असावीत, असा अंदाज वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.पौडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपणर यांच्यासह वनविभागाची टीम येथे दाखल झाली.

IAS केडर सुधारणेवरून मोदी सरकार आणि राज्य सरकारांमधील वाद शिगेला

प्राणीमित्र शेखर जांभूळकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोरटे, राहुल जाधव, अनिमल रेस्क्यू टीम, चॉईल्ड अनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक यांनी या कार्यात सहकार्य केले.

Back to top button