पुणे : अट्टल चोरटा जेरबंद; ४ लाखांचा मुद्देमाल जप्‍त - पुढारी

पुणे : अट्टल चोरटा जेरबंद; ४ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

नारायणगाव (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गवारवाडी (वैष्णव धाम) येथे चाेरी करणा्‍या अट्टल चाेरट्यांना पकडण्यात जुन्नर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (Pune Crime) पथकाला यश आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके (Pune Crime) यांनी दिली.  चाेरट्यांकडून  ४ लाख १९ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

 ओंकार बाळू गवारी (वय १९, रा. गवारवाडी वैष्णव धाम) असे अटक केलेल्‍याच्‍या चाेरट्याचे नाव आहे. त्‍याला दाेन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद विमल बाळू गवारी (वय ५५, रा. गवारवाडी वैष्णव धाम, जुन्नर) यांनी दिली.

गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२२ रोजी  गावारी हे गवारवाडी येथील घराला कुलूप लावून कुटुंबासह बारव (जुन्नर) येथील जुन्या घरी राहायला गेल्या होत्या. १३ रोजी त्‍या परत गवारवाडी येथील आपल्‍या घरी आल्‍या. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घराची कौले उचकटून कोणीतरी आत प्रवेश करून चोरी केल्याचे लक्षात आले. त्यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दिली.

जुन्नर तालुक्यातील वाढत्या घरफोडयांचे प्रमाण लक्षात घेता गुन्हा हा लवकरात लवकर उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा (Pune Crime) तसेच जुन्नर पोलीस स्टेशनला दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा व जुन्नर पोलीस स्टेशनची पथके सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हा हा कोणीतरी पाळत ठेऊन अगर ओळखीच्या इसमाने केला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार त्यांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी करत असताना एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ओंकार बाळू गवारी व अजून एक विधिसंघर्षात बालक यांच्या मदतीने चाेरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सोने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख १९ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, जुन्नरचे पोलिस निरीक्षक विकास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नरचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे हवालदार दिपक साबळे, पोलिस नाईक संदिप वारे, पोलिस जवान अक्षय नवले तसेच जुन्नरचे पोलीस हवालदार लोहकरे, पोलिस नाईक मस्के, पठारे, पोलीस जवान जोरी, वणवे, कारखीले यांनी केली.

हेही वाचा

Back to top button