Bribe : दोन हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार जाळ्यात | पुढारी

Bribe : दोन हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार जाळ्यात

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी व तक्रार न घेण्यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी करून दोन हजाराची लाच (Bribe) घेतल्याप्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले.

अनिल निवृत्ती होळकर ( वय ५२ पोलीस हवालदार चंदननगर पोलीस ठाणे ) असे लाचखोर हवलदाराचे नाव आहे. मंगळवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी होळकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bribe : पाच मागितले दोन हजार देतानाच सापडला

यातील तक्रारदार यांनी एका महिलेला उसने दिलेले ५० हजार रूपये दिले होते. तक्रारदार यांना ते पैसे परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची कोणतीही तक्रार न घेणेसाठी हवालदाराने पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्ररदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यावेळी हवालदाराने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा लावून पोलिस हवालदाराला दोन हजाराची लाच घेताना पकडले.

Back to top button