

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या गटाच्या आरक्षणाची उत्सुकता आता संपली असून जिल्ह्यातील सर्व जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र यामध्ये अनेक जागांची उलथापालथ होताना अनेक दिग्गजांना धक्का लागला असून पक्षाने पुनर्वसन करावं अशी सुद्धा स्थिती राहिलेली नसल्याने यंदाच्या जिल्हा परिषदेतून दिग्गजांना बाहेर राहावं लागणार असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
एकूण 57 जागांच्या आरक्षणांमध्ये अनुसूचित जमाती महिला साठी 19 जागा आरक्षित राहिल्या तर ओबीसी जागा मधून 8 जागा या महिलांसाठी राखीव घोषित करण्यात आल्या. तर सर्वसाधारण 4 पैकी 1 जागा स्त्री साठी राखीव करण्यात आली. तर पालघर तालुक्यातील. पास्थळ ही जागा सुद्धा अनुसूचित जमाती स्त्री राखीव करण्यात आली यामुळे एकूण 57 पैकी 29 जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
हे आरक्षण काढताना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चक्री आरक्षण न काढता नव्याने म्हणजेच ही निवडणूक पहिल्यांदाच होते असं समजून नव्याने जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर ज्या प्रमाणे लोकसंखेच्या प्रमाणात जागा निश्चित करून आरक्षण काढली जाते त्या पद्धतीने हे आरक्षण आल्याने मागील आरक्षणांचा आणि या आरक्षणाचा तसेच थेट संबंध न उरल्याने अनेक दिग्गजांना आणि इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसलेला दिसून आला.
मोखाडा तालुक्यातील तीन जिल्हा परिषदेचे गट आहेत मात्र हे तीनही गट महिलांसाठी राखीव झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला तर जव्हार तालुक्यातील सुद्धा चार पैकी तीन गट महिला राखीव झाले तर विक्रमगड तालुक्यात ओबीसींची संख्या लक्षणे असताना एकही जागा ओबीसी न झाल्याने या भागातील ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. 57 मधील एकूण 15 जागा ओबीसी 4 जागा सर्वसाधारण तर तर उर्वरित 38 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आल्या यामध्ये जाहीर झालेल्या आरक्षणा नुसार.
नागरिकांचा मागासवर्ग
(ओबीसी) ......
सातपाटी- ओबीसी,कुडूस- ओबीसी,मनोर -ओबीसी, दांडी -ओबीसी(महिला),एडवण - ओबीसी (महिला) खैरापाडा- ओबीसी( महिला) तारापूर -ओबीसी,बोईसर (वंजार वाडा)-ओबीसी,केळवा - ओबीसी (महिला),चंद्रपाडा- ओबीसी, उंबरपाडा नंदारे- ओबीसी (महिला),बोईसर ओबीसी (महिला),माहीम -ओबीसी (महिला),चिंचणी -ओबीसी आणि अर्नाळा -ओबीसी (महिला)
सर्वसाधारण आरक्षण खालील प्रमाणे........
धाकटी डहाणू -सर्वसाधारण,खूपरी -सर्वसाधारण, सरावली -सर्वसाधारण ( स्त्री)आणि कळंब -सर्वसाधारण
अनुसूचित जमाती आरक्षण खालील प्रमाणे......
विनवळ- अनुसूचित जमाती, वावर -अनुसूचित जमाती (महिला) झाप -अनुसूचित जमाती (महिला), जव्हार ग्रामीण -अनुसूचित जमाती( महिला), आंबेसरी -अनुसूचित जमाती, उपलाट -अनुसूचित जमाती, दादडे -अनुसूचित जमाती (महिला) मोडगाव -अनुसूचित जमाती (महिला), तलवाडा- अनुसूचित जमाती (महिला )सूत्रधार- अनुसूचित जमाती (महिला), वसा- अनुसूचित जमाती, चळणी -अनुसूचित जमाती (महिला) बऱ्हाणपूर- अनुसूचित जमाती(महिला), खोडाळा -अनुसूचित जमाती (महिला )चारोटी -अनुसूचित जमाती, डोंगरी- अनुसूचित जमाती (महिला )अंबोली -अनुसूचित जमाती( महिला) कैनाड -अनुसूचित जमाती, दाभोन -अनुसूचित जमाती वडवली -अनुसूचित जमाती, कुर्झे- अनुसूचित जमाती, वर्साळे -अनुसूचित जमाती, शीगाव- अनुसूचित जमाती (महिला) आशागड- अनुसूचित जमाती,मलवाडा- अनुसूचित जमाती हालोली अनुसूचित जमाती असे अनुसूचित जमाती (महिला )पोशेरा- अनुसूचित जमाती (महिला),अलोंडे- अनुसूचित जमाती (महिला) भिसे नगर- अनुसूचित जमाती (महिला), बोर्डी -अनुसूचित जमाती धूकटन- अनुसूचित जमाती, गांधरे -अनुसूचित जमाती (महिला),सरावली -अनुसूचित जमाती,भाताने -अनुसूचित जमाती, गालतरे-अनुसूचित जमाती,खाणीवली -अनुसूचित जमाती( महिला) आणि पास्थळ -अनुसूचित जाती स्त्री.
या दिग्गजांना धक्का.
2019 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,माजी बांधकाम समिती सभापती काशिनाथ चौधरी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे, शिवा सांबरे,माजी बांधकाम सभापती संदेश ढोणे, माजी कृषी सभापती संदीप पावडे यांच्यासाठी ते राहत असलेल्या किंबहुना त्याच्यासाठी सुरक्षित असलेल्या मतदार संघात त्यांना अपेक्षित आरक्षण न पडल्याने या पंचवार्षिक मध्ये त्यांचे झेडपीत येण्याचे मार्ग खडतर झाले आहेत तर काहींना या निवडणुकीपासून पर्यायाने जिल्हा परिषदेला मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाच्या आरक्षणात दिग्गजांना चांगलाच धक्का लागल्याचे दिसून आले. मात्र तरीही पक्षीय पातळीवर यातील काही महत्त्वाच्या नेत्यांचे इतरत्र सुरक्षित राहतील अशा जागांवर लढवून पुनर्वसन करण्यात येईल का? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या चिमुकल्यांनी ठरविले 57 सदस्यांचे भवितव्य
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात दुपारी तीन वाजता ही आरक्षणाची प्रक्रिया पार पडली यावेळी आरक्षित गटांच्या मग त्या ओबीसी जागांची असतील सर्वसाधारण जागांच्या असतील की अनुसूचित जमाती च्या जागा आणि महिलांसाठीच्या राखीव जागा सुद्धा जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या यामध्ये आर्यन दळवी आणि श्रावणी दळवी या दोन चिमुकल्यांनी या चिट्ठी आपल्या हातांनी काढल्या यामुळे या 57 जागांच्या आरक्षणाचे भवितव्य चिमुकल्या हाताने ठरविल्याचे चित्र यावेळी दिसून आले.