विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील हळवार जातीचे भातपीक जवळपास तयार झाले असून काही दिवसातच कापणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे भाताचे शेत सोन्यासारख्या पिवळ्या रंगाचे दिसून येत आहे.
विक्रमगड तालुक्यात केवळ भातशेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच एकमेव खरिपाचे पीक घेतले जाते. त्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना वर्षभर गुजराण करावी लागते. पावसाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना पर्यायाने सहन करावा लागतो. याचा प्रत्यय गेल्यावर्षी आला.
यावर्षी विक्रमगडसह पालघरमध्ये भातशेतीस उपयुक्त पाऊस झाल्याने पीक बहरले आहे. हळवे भातपीक कापणीला आले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या परतीच्या पावसाच्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे.