

पालघर ः पालघर नगरपरिषदेच्या प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत बुधवारी पालघरचे उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. नगर परिषद कार्यालयाच्या आवारातील सोडतीसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. ऑन कॅमेरा पार पडलेल्या सोडतील स.तू.कदम शाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या हाताने चिठ्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रभाग आरक्षित झाल्याने निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या काहींचा हिरमोड झाला.आरक्षणात मोठे बदल झाले नसल्याने दिग्गज समाधानी असुन निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.आरक्षित जागांवर पात्र उमेदवारांचा शोध सुरु झाला आहे.सोडतीत जाहीर झालेल्या आरक्षणावर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकतीं नोंदवता येणार आहेत.
पालघर पूर्वेकडील माजी नगरसेवक तुषार भानुशाली (प्रभाग क्रमांक 3)आणि प्रवीण मोरे (प्रभाग 4)यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत. तसेच पूर्वे कडील प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन्ही जागांवर महिला आरक्षण जाहीर झाल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाचे सूरज धोत्रे यांची संधी हिरावली आहे.
प्रभाग निहाय आरक्षण
1अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,1ब सर्वसाधारण ,2अ अनुसूचित जमाती,2ब सर्वसाधारण महिला,3अ अनुसूचित जमाती, 3ब सर्वसाधारण महिला,4अ अनुसूचित जाती,4ब सर्वसाधारण महिला,5अ नागरिकांचा मागास प्रवर्ग,5ब सर्वसाधारण महिला,6अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 6ब सर्वसाधारण, 7अ अनुचित जमाती महिला, 7ब सर्वसाधारण, 8अ सर्वसाधारण महिला, 8ब सर्वसाधारण,9अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,9ब सर्वसाधारण, 10अ सर्वसाधारण महिला, 10ब सर्वसाधारण, 11अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, 11ब सर्वसाधारण,12अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 12ब सर्वसाधारण महिला, 13अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 13ब सर्वसाधारण महिला, 14अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 14ब सर्वसाधारण महिला, 15अ अनुचित जमाती महिला, 15ब सर्वसाधारण