

पालघर: हनिफ शेख
अगदी पंधरा-वीस दिवसांपूर्वी मोखाडा तालुक्यातील वेठबिगारीचे भयान वास्तव समोर आले होते यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी होऊन पुढील कार्यवाही करताना दिसली मात्र वेट बिगारीचा घट्ट आवडलेला फास काही निघायला तयार नसल्याचे आता दिसून येत आहे. कारण की मोखाडा तालुक्यातील वेठबिगारीची आता दुसरे भयान वास्तव समोर आले असून तालुक्यातील शेंड्याचीमेट, उधळी हट्टी पाडा या भागातील दहा मुले दोन पुरुष आणि एक महिला अशा वेडबिगारींची बीड जिल्ह्यातून मुक्तता करण्यात आली असून दोषीनविरुद्ध गुन्हा नोंद झाल्याचे देखील समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील तत्त्वशील कांबळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेला वाचा फोडून सर्वांसमोर आणले, त्यातूनच या वेठबिगारांची सुटका झाली आहे. तालुक्यातील प्रदीप वाघ यांनी सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क करून त्याचा भाऊ पिंटू वाघ हा गेल्या चार ते पाच वर्षापासून बीड जिल्ह्यात असल्याचे सांगून शोध घ्यायला सुरुवात केली त्यातूनच हा प्रकार समोर आला यावेळी पिंटू वाघ त्याची पत्नी आणि तीन मुली तर प्रकाश गोतरणे आणि त्याची सात मुले हे गेल्या कित्येक वर्षांपासून त्या भागात आरोपींकडे कमी पैशात काम करत असल्याचे समोर आले तर सणासुदीला अधिकचे पैसे देऊन त्याच्यावर कर्जावर कर्ज ठेवून यांनाच त्या ठिकाणी बंदिस्त ठेवल्याचे या घटनेनंतर समोर आले आहे.
प्रकाश गोतरणे यांच्या सात बालकांपैकी काही मुली या त्याच भागातील काही नागरिकांना कामासाठी 15 हजारात विकल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच असंघटित कामगारांचे विशेष सेल जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सदस्य असलेले तत्त्वशील कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना मोखाडा तालुक्यातील शेंड्यांची मेट येथे राहणार्या प्रदीप वाघ यांनी संपर्क करून याबाबतची हकीकत सांगितली यानंतर कांबळे यांनी बीड येथील जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार,जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे अनिता कदम,सरकारी कामगार अधिकारी अजय लवाळे, राहुल उबाळे आणि शिरूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सोबतीने तागडगाव या ठिकाणी या आरोपींच्या घरी धडक देऊन या सर्व वेठबिगारांची सुटका केली.
यातील प्रकाश गोतरणे यांच्या काही मुली दुसर्या गावात भांडी धुनी म्हशीच्या गोठ्यात काम करणे आरोपींच्या घरातील वयस्कर मंडळींची सेवा करणे हातपाय दाबणे अशा अनेक कामात या मुली ठेवल्याचे देखील यावेळी समोर आले अगदी कमी पैशात अधिकच काम करून घ्यायचं वेळोवेळी थोडे पैसे देऊन अंगावर कर्ज करून ठेवायचं त्या मोबदल्यात कामे करून घ्यायची आणि कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी द्यायची अशा भयान प्रकार यातून आता समोर आला आहे.
या घटनेमध्ये आरोपी धर्मराज धनवटे,मारुती सानप. नंदू पवार रामहारी खेडकर यांच्यावर शिरूर (बीड) याठिकाणी गुन्हा नोंद झाला आहे मात्र अशा घटना थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलणे आता गरजचे बनले आहे.शासनाकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून रोजगार दिल्याच्या कितीही कागदोपत्री आकडेवारी सादर होत असली तरीही जव्हार मोखाडा तालुक्यातील स्थलांतर हा मुद्दा अतिशय भयावह बनल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
संबधितांवर कारवाई कधी
या भागातील गरजवंत आदिवासी बांधवांचा त्यांच्या गरीबीचा फायदा घेताना हे पर जिल्ह्यातील लोक दिसून येत आहे या घटना समोर आल्यानंतर याबाबतची सत्य उघडकीस होते मात्र तोपर्यंत कित्येक वर्षापासून अशी अनेक कुटुंब इतरत्र वेठबिगारी करीत असल्याचे चित्र आहे.आजही जर अशा कुटुंबांचा शोध घेतला तर या ठिकाणी शेकडून समोर येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ज्याप्रमाणे त्या गुन्हेगारांवर कारवाई होते त्याप्रमाणे या नागरिकांना स्थलांतर करण्यास जबाबदार यंत्रणेवर सुद्धा आता कारवाई होणे आवश्यक आहे.