

जव्हार ः जुलै अखेरीस ओव्हरफ्लो होणारा जव्हारचा जयसागर धरण ओव्हरप्लो होवून, क्षमतेने भरून वाहू लागला आहे. या धरणाची 6 मीटर उंची मागील वर्षी वाढविण्याचे काम पूर्ण झाले होते, उंची वाढल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.तर धरण क्षेत्रातील बहुताऊस कोरडी जमीनही पाण्याखाली गेली आहे. धरण भरल्याने जव्हारकरांची वर्षभराची चिंता दूर झाली आहे. मात्र मागील काही दिवसंपासून धो धो बरसणार्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
जव्हार नगरपरिषद क्षेत्र आणि त्यातच जव्हार नगरपरिषदे लगत कासटवाडी व रायतळे या ग्रामपंचायतीचा काही भाग येतो. दरम्यान रहदारी वाढल्याने, जवळपास एकूण 25 हजाराच्या आसपास लोकसंख्यात वाढ झाली आहे. त्यामुळे जव्हारकरांना दरवर्षी मोठ्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. जय सागर धरण जुलैच्या सुरवातीलाच ओव्हरफ्लो झाल्याने जव्हारांची पाण्याची चिंता मिटली आहे.
जयसागर धरण क्षमतेने भरल्यामुळे परिसरात विहंगम दृश्य दिसत आहे, त्यामुळे जयसागर धरणही आता पर्यटकांच्या यादीत समाविष्ट झालेला आहे. जव्हारकरांची तहान भागवणारे एकमेव धरण असल्याने, ते जव्हार सिल्वासा रोड लगत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने देखील चांगले झाले आहे. पाऊस कमी झाला की पर्यटकांची गर्दी वाढते त्यामुळे जय सागर धरण ओव्हारप्लो भरल्याने, जव्हार करांची तहान उन्हाळ्याची तहान मिटली आहे.