पालघर : हॅकर्सची तरुणांना डोकेदुखी; लाईट बिल भरण्याचा बनावाने केला मोबाईल हॅक | पुढारी

पालघर : हॅकर्सची तरुणांना डोकेदुखी; लाईट बिल भरण्याचा बनावाने केला मोबाईल हॅक

सफाळे;  पुढारी वृत्तसेवा :  लाईट बिल गुगल पेने भरण्यासाठी तुला अपडेट करावं लागेल असं सांगून सफाळे जवळील कांद्रेभुरे गावातील एका तरुणाकडून आवश्यक माहिती घेऊन त्याचा मोबाईल हॅक करून त्याला अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल केले जात असल्याची सदर तरुणाने तक्रार केली आहे.

कांद्रेभुरे गावातील एक सुशिक्षित तरुण आपले लाईट बिल गुगल पे ने भरत असे. या महिन्याचे लाईट बिल गुगल पेने भरण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करावं लागेल असे संबंधित व्यक्तीने त्या तरुणाला फोनवर सांगितले. सदर तरुणाने अॅप डाऊनलोड केल्यानंतर तरुणाकडून बरीच माहिती संबंधित व्यक्तीने घेतली. तदनंतर बँक अकाउंट साठी त्या व्यक्तीने तरुणांकडून ओटीपी मागितला. मात्र तरुणाने ओटीपी न दिल्याने तरुणाकडून पैसे उकळण्याचा संबंधित व्यक्तीचा डाव फसला. अकाउंट मधून परस्पर पैसे काढता न आल्याने तरुणाचा मोबाईल हॅक करून त्याच्या मोबाईल नंबर वरून अश्लील मेसेज, फोटो पाठवून तसेच त्याला फोन करून ब्लॅकमेल केले जात आहे. या तरुणाने आज माझ्या सारख्या सुशिक्षित माणसाची फसवणूक होऊ शकते तर बाकी लोक यात कसेही फसतील असे सांगितले.  याबाबतीत सफाळे पोलिस ठाण्याबरोबरच सायबर मध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या घटना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे बोलले जात असून काही तरुणांनी अशा घटनांचा धक्का सहन न झाल्याने जीवन संपवल्याचेही बोलले जात आहे.

Back to top button