पालघर : दिवाळीसाठी वंचित, उपेक्षितांची तारेवरची कसरत | पुढारी

पालघर : दिवाळीसाठी वंचित, उपेक्षितांची तारेवरची कसरत

वागळे; अर्जुन चेमटे :  दिवाळी म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण! हा सण साजरा करीत असताना आपण सर्वच आनंदाने आपल्यासाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी वेगवेगळ्या खरेदया करीत असतो. गोड पदार्थ, नवे कपडे, नवे साहित्य, फटाके या सर्वांचीच आपल्याकडे रेलचेल असते. आपण हा सण साजरा करीत असताना आनंदाचा, उत्साहाचा दीप, आकाश कंदील घरासमोर पेटवून आपले आयुष्यातील दु…खाचा अंधकार नष्ट करत असतो. पण समाजातील अनाथ, वंचित, उपेक्षित व निराधार वर्ग राहत असतो जिथे दिवाळीचे दीप पेटलेच जात नाहीत. त्यांना उत्सहाचा, आनंदाचा दीप लावण्यासाठी स्वत…चे घर, स्वत…चा आधार नसतो. असे परराज्यातील अनेक कुटुंब पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात  येत असल्याचे दिसत आहेत.

पोटासाठी अनेक जण विविध उद्योग करत आपले पोट भरत आहेत. यामध्ये काहीजण कसरतीचे खेळ दाखवून त्यामधून मिळालेल्या तुटपुंज्या कमाईमधून उदरनिर्वाह करत असतात. डोंबारी व भटक्या जमातीतील समाज आजही आजोबा-पंजोबांपासून पारंपरिक पद्धतीने शिकवण घेतलेल्या कौशल्यांचे आधारावर तारेवरच्या जीवघेण्या अनेक कसरती करून जीवन जगत आहेत. असा व्यवसाय करणारे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर व झांजगीर या जिल्ह्यातील अनेक कुटुंबे महाराष्ट्रात आलेली असून ती कुटुंबे ठाणे जिल्ह्यातील पनवेल या शहरात झोपडी, पाल
उभारुन रस्त्यांवर रहात आहेत.

ही कुटुंबे सुर्य उगवला की गावोगावी जाऊन कसरतीचे खेळ करतात व सुर्य मावळ्यानंतर होणार्‍या अंधारा प्रमाणे जीवणात झालेल्या अंधारत पुन्हा पनवेल येथील झोपडीत जावून आपला उदरनिर्वाह करतात. यातीलच संतोष नथ यांचे दोन मुले व पत्नी असे चार माणसांचे कुटुंब पोटासाठी ठाण्यातील गोखले रोड, नौपाडा येथील रस्त्याचे कडेला दिवाळी सणाची धामधूम सुरू असताना खरेदी विक्रीचे दुकाने साकारलेले असताना त्यामध्ये सर्व नागरिक आनंदाने उत्साहाने खरेदी करत असताना या कुटुंबातील सात वर्षाचा मुलगा बजरंगी मुलीचे वेशांतर कहप व साडेतीन वर्षाचा
मुलगा प्रयास तोंडावर कलर करून पोटाची खळगी भरण्यासाठी व दिवाळी सणांमध्ये आमचे घरामध्ये दिवा पेटेल या आशेने तारेवरची जीवघेणी कसरत करत आहेत. त्यामध्ये दोरी वरती चालणे, डोक्यावर कळशांची मांडणी करणे, चाकावर चालणे असे गाण्यांचे तालावर कौशल्य दाखवतात. यांना कसल्या दिवाळीच्या सुट्ट्या, कसली दिवाळीची खरेदी, कसले दिवाळीचे स्वप्न, ना फाटाके, ना कपडे, ना गोड पदार्थ सध्या फक्त यांच्यासमोर प्रश्न आहे तो म्हणजे एक वेळचं जेवण मिळणे आणि आपले पोट भरणे.

शाळेपासून दूर असलेले हे चिमुरडे जीवनाचा उद्याचा सूर्य माहीत नसताना रात्री मिळेल त्यामध्ये पोट भरून निवांतपणे झोपतात. पून्हा सूर्य उगवताच त्याच समस्या, तेच दु…ख घेऊन रस्त्यावरती उतरणारे हे भटके बांधव कुठपर्यंत आपल्या दु…खांना समस्यांना विंचाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन दरदर फिरत राहणार याची त्यांना कल्पना नाही.

वृद्ध, अपंगांसारखे आम्हालाही अर्थसहाय्य करा

अनाथ, वंचित, उपेक्षित व निराधार समाजाला आधार देण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धतीने सुरू केलेले जीवन जगण हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे शासन वृद्धांसाठी, निराधारंसाठी, अपंगांसाठी व अनाथांसाठी विविध योजना राबवून त्यांना स्थैर्य देत आहे त्याचप्रमाणे समाजातील भटकंती करणार्‍या हातावरती पोट असणार्‍या तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहेत. शाळेपासून दूर असणार्‍या या कुटुंबाला व विद्यार्थ्यांना स्थैर्य देणे गरजेचे आहे. म्हणून शासनाने विकसनशील व आधुनिक देशांमध्ये या समाजाकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे, असे संतोष नथ यांनी दै. पुढारीला सांगितले.

Back to top button