
पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा केंद्रात तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) चा एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
जवान मनोज यादव गुरुवारी बेपत्ता झाल्याची तक्रार पालघर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यादव एक रायफल आणि ३० काडतुसे घेऊन बेपत्ता झाल्याचे त्यांनी सांगितले.
जवान कॉलनीत एकटाच राहत होता आणि इतर कर्मचाऱ्यांना तो काही वेळाने परत येईल असा समज होता, पण तो परत आलाच नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे प्रकरण स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले असून पोलीस आणि केंद्रीय संस्था त्याचा शोध घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :