पालघर : पेल्हारच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तासह ठेका अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, तीन जणांवर गुन्हा | पुढारी

पालघर : पेल्हारच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तासह ठेका अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, तीन जणांवर गुन्हा

वसई (पालघर); पुढारी वृत्तसेवा : वसई विरार महापालिकेच्या वालीव आणि पेल्हार-धानीव या दोन प्रभाग समिती क्षेत्रात अनाधिकृत बांधकामांचे मोठे पेव फुटल्याच्या तक्रारी सातत्याने होत असताना पालिका प्रशासनाला यावर आळा घालण्यास अपयश आल्याचे समोर आले आहे. पेल्हार-धानीव प्रभाग समितीच्या प्र. सहाय्यक आयुक्त रुपाली राजेंद्र संखे आणि कंत्राटी अभियंता हितेश जाधव यांच्या विरोधात एका व्यवसायिकाचे अनाधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी मजुरा मार्फत 40,000 रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रयत्नात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून, तिघांना ताब्यात घेतले. पेल्हार-धानीव प्रभाग समिती क्षेत्रात गेल्या दीड वर्षात ही अशी दुसऱ्यांदा कारवाई  झाली असून, पालिका प्रशासनाचा भोंगळ आणि भ्रष्टाचारी कारभार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हा बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी झाबरपाडा येथे दुकान दुरुस्ती व त्याची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले होते. त्या बांधकामाला निष्काशीत न करण्यासाठी प्र. सहा आयुक्त रुपाली संखे आणि हितेश जाधव, कंत्राटी अभियंता यांनी तक्रारदाराकडे 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तडजोड करुन 40,000 रुपये लोकसेविका रुपाली संखे यांनी मान्य केले होते. सदर रक्कम कार्यलयातील कंत्राट मजूर गणेश झणकरकडे देण्यास सांगितले.

दरम्यान, तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. या विभागाकडून साफळा रचण्यात येऊन, कंत्राट मजूर गणेश झणकर याणे ही रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न करतांना रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Back to top button