मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटला | पुढारी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटला

डहाणू: पुढारी वृत्तसेवा :  मुंबई -अहमदाबाद महामार्गांवर तवा गावाजवळ सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास टँकर क्र.जीजे 12 झेड 7883 चालक जगराम गुजर वय35 हा गुजरात बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने सदर टँकर चालकाने अर्जंट ब्रेक मारला असता टँकर डिव्हायडरवर चढून पलटी झाला.

त्यात केबिनची काच फुटल्याने टँकर चालक डिव्हायडरमध्ये पडल्याने त्यात किरकोळ मार लागला. तसेच टँकर पहिल्या व दुसर्‍या लेनवर पलटी झाला. चालकास रुग्णवाहिकेमधून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून महामार्ग पोलीस व कासा पोलीस यांनी क्रेन च्या साहाय्याने पलटी झालेला टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. या टँकरमध्ये खाद्यतेल होते. काही दिवसापूर्वी याच परिसरात खाद्य तेलाचा टँकर पलटी झाला होता, त्यातून तेलाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने अनेक नागरिकांनी हंडा, कळशी, ड्रम, बाटल्यांमध्ये खाद्य तेल पळवले होते.

Back to top button