दोघांना अटक; 10 गुन्ह्यांची उकल | पुढारी

दोघांना अटक; 10 गुन्ह्यांची उकल

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे अलंकार हिसकावून धूम स्टाईलने पोबारा करणार्‍या दोघा लुटारूंचा कणा मोडून काढला आहे. या दोघा सराईत बदमाश्यांकडून आतापर्यंत 10 गुन्ह्यांची उकल करून 6 लाख 90 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शनिवारी 11 जून रोजी सकाळी 6.55 च्या सुमारास 49 वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून दोघा दुचाकीस्वार लुटारूंनी पळ काढला होता. सीसीटिव्ही कॅमेर्‍यातील फुटेज, तसेच तांत्रिक मुद्द्यांवर सलग 8 दिवस कस्सून शोध मोहीम राबवून रिजवान ईस्माईल शेख (37) आणि महंमद आलम अस्लम कुरेशी (25, दोन्ही रा. शिळफाटा, मुंब्रा) या बदमाश्यांची थरारक पाठलाग करून गठडी वळली. या दोन्ही बदमाश्यांकडून आतापर्यंत एमएफसी पोलिस ठाण्यातील 5, बाजारपेठ पोलिस ठाण्यातील 2, मुंब्रा पोलिस ठाण्यातील दुचाकी चोरीचा 1, मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यातील 1, पेल्हार (वसई) पोलिस ठाण्यातील 1 असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Back to top button