पालघर : धनगर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर संयुक्त आदिवासी संरक्षण समिती, आदिवासी एकता परिषद आणि विविध संघटननाचे पदाधिकारी यांनी रॅली काढून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी जर शासन अशीच भूमिका घेत असेल तर आदिवासी संघटना, आदिवासी समाजातील नेते आहेत ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेलो, सह्याद्री अतिथी गृही गेलो तरीही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट नाकारली आणि धनगरांच्या शंभर वेळा मिटिंग होतात. हे सरकार आदिवासींच्या विरोधी सरकार आहे, असा आरोप करण्यात आला.
आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॉ. सुनील पहाड, काशिनाथ चौधरी, अशोक शिंगाडा, प्रसाद पहाड, माधव लिलका, राहुल धूम, परशुराम चावरे, गुरुनाथ सहारे, रामदास हरवटे, प्रकाश पाटकर, ऍड. दळवी, सागर सुतार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे मंगेश दुबळा, चंदन ढाक, मनोज आंबात यासह पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा या मोर्चामध्ये मोठा सहभाग होता.