भोकरबारी धरणातील पाण्यात खेळताना तीन बालकांचा मृत्यू

दोन जण पाण्यात उतरले नसल्याने बचावले
Three children died while playing in the water of Bhokarbari Dam
भोकरबारी धरणातील पाण्यात खेळताना तीन बालकांचा मृत्यू .Pudhari File Photo
Published on
Updated on

जळगांव : पारोळा तालुक्यातील भोकर भारी धरणा जवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आलेल्या पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दोन जण पाण्यात उतरले नसल्याने ते बचावले असल्याची घटना आज (दि. 3) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. ही घटना वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ घडली.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तीन जण बुडाले

पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन 3 रोजी पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरवारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय 16), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय 14, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय 17 रा. मालेगाव जि. नाशिक) येतील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे या पाचही जणांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. धरणात उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले.

स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी

त्या पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभी असलेले आश्रम पीर मोहम्मद (वय 9), इब्राहिम शेख अमीर (वय 14) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. व घडलेल्या घटनेची आप भीती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यावेळी डॉक्टर प्रशांत रनाडे, डॉक्टर सुनील पारोचे, डॉक्टर गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी पोलीस निरीक्षक अमळनेर विकास देवरे, तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे बाळू गीते, भोकरबारी पोलीस पाटील ज्योती ज्ञानेश्वर बिरारी, शहर तलाठी निशिकांत माने, पोलीस हिरालाल पाटील , योगेश शिंदे, आकाश माळी सुनील हाटकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, डॉक्टर संभाजी राजे पाटील, माजी खासदार एटी नाना पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी सातवण पर भेट दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news