Raksha Khadse | फायदा होण्यासाठी महाविकास आघाडीचे गलिच्छ राजकारण

पाथर्डी फाटा येथे भाजपाचे महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी
निषेध
सिडको : पाथर्डीफाटा येथे निषेध आंदोलन करताना ना. रक्षा खडसे. समवेत सिमा हिरे, प्रशांत जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते.(छाया : राजेंद्र शेळके)
Published on
Updated on

सिडको : मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली असताना देखील फक्त आणि फक्त आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फायदा होईल यासाठी महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे.

पाथर्डी फाटा येथे रविवार (दि.1) रोजी महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे मुख्य नेते शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी आमदार सिमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे, नाना शिलेदार, रवी पाटील, महिला शहराध्यक्षा सोनाली ठाकरे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, माजी नगरसेवक ॲड. शाम बडोगे, माजी नगसेवक बाळासाहेब पाटील, माजी नगरसेविका छाया देवांग, माजी नगरसेवक राकेश दोंदे. माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, माजी नगरसेवक संजय नवले, यशवंत नेरकर, गिरीश पालवे, डॉ. वैभव महाले यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news