नाशिक : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.२३) महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान येथे हा मेळावा पार पडणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. मेळाव्याला ५० हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. सदर लाभार्थींकरीता ९०० बससेची व्यवस्था करण्यात आली आहे.
मेळाव्याचे नियोजन
-४० बाय १५० मीटरचा मुख्य मंडप
-जर्मन वॉटरप्रुुफ मंडपाची उभारणी
-पावसापासून संरक्षणासाठी ३० नेट
-दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था
-बचत गटाचे स्टॉल्स, शासकीय स्टॉल्स उभारणार
-सिटी लिंकच्या २००, एसटी महामंडळाच्या ७०० बसेसचे नियोजन
-आठ ठिकाणी वाहनतळाची सुविधा
-लाभार्थींना बसेसमध्ये अन्नपदार्थांचे पाकीट देणार
शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणे योजनेच्या प्रचारासाठी राज्यभरात मेळावे घेतले जात आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तपोवनातील मेळाव्यासाठी वॉटरप्रुफ मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. मंडपात ५० हजार महिला लाभार्थींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी कार्यक्रमाच्या स्थळी भेट देत पाहाणी केली. कार्यक्रमस्थळी महिलांशी संबंधित शासनाच्या कल्याणकारी योजनांचे स्टॉल उभारावे. तसेच आरोग्य शिबीर राबविण्याचे सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्ह्याभरातून मेळाव्यासाठी महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहे. त्यामूळे महिलांंकरीता ९०० बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याकरीता जिल्ह्यासह धुळे, जळगाव आणि नगर येथून अतिरिक्त बसेस मागविण्यात आल्या आहेत. मेळाव्यासाठी येणाऱ्या महिला लाभार्थींची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. जिल्ह्याभरातून बसेस व खासगी वाहने येणार असल्याने वाहनतळाची विशेष लक्ष द्यावे, आदी सूचनाही भुसे यांनी केल्या आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही शिबीराच्या ठिकाणी मान्यवरांची बैठकव्यवस्था, वीज पुरवठा, जनरेटर्स, महिला लाभार्थींची वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पेयजल, अग्निशमन यंत्रणेसह अन्य बाबींवर अखेरचा हात फिरवला.