Nashik Crime | बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवर टोळक्याकडून हल्ला, पोलिस निरीक्षक जखमी

सात जणांना अटक
Nashik Crime |
बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवर टोळक्याकडून हल्लाFile Photo
Published on
Updated on

सिडको : बिल्डर व जमीन मालकाच्या वादात मनपा अधिकाऱ्यांच्या सूचनेवरुन बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवरच १० ते १५ जणांच्या टोळक्याने हल्ला चढविल्याची घटना केवल पार्क रोडवर शुक्रवारी (दि. २) घडली. यात पोलिस निरीक्षकासह महिला उपनिरीक्षक जखमी झाली असून, याप्रकरणी सात संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गाडे मळा येथे बिल्डर माणिक सोनवणे व जमिन मालक गाडे यांच्यात जागेवरून वाद असून प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने बिल्डर सोनवणे यांना त्या ठिकाणी बांधलेले अपूर्णावस्थेतील ४२ गाळ्यांचे काम पूर्ण करून घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार बिल्डरसमवेत नाशिक महानगरपालिकेचे शाखा अभियंता गोकुळ पगारे हे कार्यस्थळी गेलेत. त्यांनी गाडे यांना उच्च न्यायालयाचा आदेश समजावून सांगितला. यावेळी बिल्डर व गाडे यांच्यात वाद झाला. तेव्हा अंबड पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पवार, पोलिस उपनिरीक्षक सविता उंडे हे दोन कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना बिल्डरची बाजू घेतल्याच्या संतापासून जमीन मालकाकडील जमावाने थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. यात चाकुचा वापर झाला. या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झालेत. यानंतर तत्काळ पोलिसांनी फौजफाटा मागवत शांतता प्रस्थापित करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक उंडे यांच्या फिर्यादीवरून संशयित बेबी उर्फ सुजाता गाडे, सनी गाडेकर, गणेश गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री गाडे, राधिका गाडे व इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, सात जणांना अटक झाली आहे.

---

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news