नाशिक : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना! आता मिळणार मोफत गॅस सिलिंडर

वर्षांला तीन सिलिंडर देण्याची घोषणा; अडीच लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
Mukhyamantri Annapurna Yojana
Mukhyamantri Annapurna Yojanapudhari news network
Published on
Updated on

नाशिक : राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करतानाच पंतप्रधान उज्वला योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षांला तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्यास्थितीत नाशिक जिल्ह्यात उज्वला योजनेत पात्र ठरलेल्या 2 लाख 41 हजार 622 लाभार्थी महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

लाडक्या बहिणींचा संसाराचा गाडा सुरळीत चालावा यासाठी महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेताना बहिणींचे स्वयंपाकघराचे बजेड कोलमडू नये, यासाठी अन्नपूर्णा योजनेचा (Mukhyamantri Annapurna Yojana) शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील 52 लाख 16 हजार 412 परिवारातील महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मिळणार आहेत.

गॅस सिलिंडर योजनेचा उद्देश असा

मुख्यमंत्री गॅस सिलिंडर योजनेमुळे (Mukhyamantri Annapurna Yojana) दारिद्रय रेषेखाली जगणार्‍या महिलांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार आहे. राज्यातील सुमारे दीड लाख परिवारांमधील लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ होईल, असा शासनाचा अंदाज आहे.

असे आहेत नियम, अटी व शर्ती

  • मुख्यमंत्री गॅस सिलिंडर योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची मुळ निवासी असावयास हवी.

  • अर्जदार महिलेचे वय हे 21 ते 65 दरम्यान असावयास हवे.

  • दारिद्रय रेषेखालील असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

  • एका कुटुंबातील एकाच महिलेला गॅस सिलिंडर योजनेचा लाभ होईल. 1 जुलै 2024 नंतर नवीन रेशनकार्ड धारक महिलांना या योजनेचा लाभ होणार नाही.

  • वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असणाऱ्या कुटुंबातील महिला सदस्यालाच या योजनेचा लाभ होणार आहे.

  • पात्र लाभार्थी महिलेचे आधारकार्ड लिंक केलेले असावे. ज्या परिवाराकडे 14.2 किलोचे घरगुती गॅस जोडणी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ होईल.

आवश्यक कागदपत्रे अशी...

  • आधारकार्ड

  • रहिवाशी प्रमाणपत्र

  • रेशनकार्ड

  • उत्पन्नाचा दाखला

  • वयोगटाचा दाखला

  • मोबाईल नंबर

  • पासपोर्ट साईज फोटो

नोंदणी कुठे व कशी करणार

मुख्यमंत्री गॅस सिलिंडर योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी प्रथम मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून नारी शक्ती दूत अ‍ॅप डाऊनलोड करावे., अ‍ॅपमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉगइन करावे, लॉगइन करताना प्रथम आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर नोंदणी करावा, यानंतर आवश्यक नियम अटी व शर्ती पूर्ण करून लॉगइन करावे. यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी अ‍ॅपमध्ये दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करून ओटीपी व्हेरीफाय करावा, यानंतर आपले पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका याची नोंदणी करावी. यानंतर नारी शक्तीचा प्रकार टाईप करावा. उदा. सामान्य महिला, गृहिणी, आंगणवाडी सेविका, ग्रामसेविका यापैकी. यानंतर प्रोफाईल अपडेटवर क्लिक करावे, यानंतर मुख्यमंत्री गॅस सिलिंडर योजनेचा नोंदणी फॉर्म भरावा. यानंतर मागणी करण्यात आलेले सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे. यानंतर प्रतिज्ञापत्र सबमीट करावे. फॉर्म सबमीट झाल्यावर आपणास एक नोंदणीचा नंबर प्राप्त होईल ज्यास आपल्याला सेव्ह करुन ठेवायचे आहे. अर्ज करताना अडचण आल्यास हेल्पलाईन नंबर : 1800 2333555, 1800 2666696 (सकाळी 8 ते सायंकाळी 8 दरम्यान) संपर्क करता येऊ शकतो.

मुख्यमंत्री गॅस सिलिंडर योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची यादी तेल कंपन्यांच्या संकतेस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याला ही माहिती अद्ययावत करण्यात येईल. तेल कंपन्यांना द्यावयाची प्रति सिलिंडर 830 रुपये पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात राज्य शासनाकडून जमा करण्यात येईल. लाडकी बहिण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या केवायसी कागदपत्रांची तपासणी राज्य शासनाकडून सुरू आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर गॅस कंपन्यांकडून पात्र लाभार्थी महिलांची यादी शासनाला प्राप्त होणार आहे. त्यानंतर सिलिंडर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

पंकज पवार, धान्य वितरण, नाशिक.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news