Nashik | देवस्थान जमिनीची परस्पर विक्री; माजी आ. संजय पवारांसह सात जणांविरुद्ध गुन्हा

नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची जमीन
Fraud News
देवस्थान जमिनीची परस्पर विक्री; माजी आ. संजय पवारांसह सात जणांविरुद्ध गुन्हाFile Photo
Published on
Updated on

मनमाड(जि. नाशिक) : नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील जमीन बनावट दस्त, खोट्या सह्या आणि दुसरीच व्यक्ती उभी करून सुमारे एक कोटी १० लाखांमध्ये विक्री करून अपहार केल्याप्रकरणी विश्वस्त राजेंद्र वाल्मीक पवार यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार संजय पवार यांच्यासह सात जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दाखल फिर्यादीनुसार, संजय सयाजी पवार (४०, रा. नागापूर), रफनंदनपुरी हरनारायणपुरी (रा. पेगलवाडी, ता. त्र्यंबक), लोकेश अशोक गवळी (३८, रा. सातपूर कॉलनी, नाशिक), हर्षल अविनाश शिखरे (३६, रा. शिवाजी चौक, ता. त्र्यंबकेश्वर), संपत विष्णू चव्हाण (४१, रा. अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर), धनंजय मोहन देशमुख (३७, रा. देशमुख चौक, ता. त्र्यंबकेश्वर) तसेच इतर दोन व्यक्ती अशा आठ जणांनी संगनमताने कटकारस्थान करत नागापूर येथील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील जमीन दि. १७ सप्टेंबर ते ३ डिसेंबर २०१४ दरम्यान मनमाड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्तऐवज करून तत्कालीन विश्वस्त महंत हरनारायणपुरी यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या जागी दुसरी व्यक्ती उभी करून एक कोटी १० लाख रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यातील गुन्हा मनमाड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news