Nashik | ॲम्ब्युलन्स हरवली आहे, सापडल्यास संपर्क साधावा

बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे आंदोलन
Nashik | Ambulance is lost, contact if found
बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे आंदोलन करण्यात आले. Pudhari Photo
Published on
Updated on

सुरगाणा : गेल्या दोन महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हाल होत आहेत. प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने बोरगाव घाटमाथा परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनतर्फे बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवारी (दि.२७) रोजी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ ॲम्ब्युलन्स हरवली आहे. अशा आशयाच्या बॅनरला पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली होती.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर पावसात महिलांच्या साक्षीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते. बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात. गंभीर जखमींना उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. परंतु १०८ ॲम्बुलन्स नसल्याने नाहक काही रुग्णांचा उपचारा अभावी मूत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. यासर्व गोष्टीचे गांभीर्य घेत बोरगाव घाटमाथा परिसरात नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, दिपक गांगुर्डे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

प्रशासनाला जाग येण्यासाठी बिरसा मुंडा चौकात अनोखे आंदोलन करुनही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

-पंकज चव्हाण, आदिवासी आसरा फाउंडेशन सचिव

आम्हाला कायमस्वरूपी १०८ ॲम्बुलन्स हवी आहे. प्रशासन फक्त आंदोलन केले की दहा ते बारा दिवसांसाठी तात्पुरता स्वरूपात ॲम्बुलन्स पाठवते. हे नेहमीचे झाले आहे.

-विजय दळवी, कणसरा फाउंडेशन अध्यक्ष, मोहपाडा.

प्रशासन हे सुरगाणा तालुक्याला वाळीत टाकल्यासारखा प्रकार करत असल्याने आम्ही कोणाकडे दाद मागावी अशा प्रश्न निर्माण होत आहे. १०८ ॲम्बुलन्स नसल्याने तीन महिन्यांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यास कोण जबाबदार असेल हा प्रश्न पडला आहे.

- सचिन राऊत, आदिवासी आसरा फाउंडेशन अध्यक्ष

१०८ अॅम्ब्युलन्स सेवा अत्यावश्यक सेवा असून नियमित अॅम्ब्युलन्स नसने ही गंभीर बाब आहे. याबाबत आमच्या स्तरावरून वरीष्ठ अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी ॲम्बुलन्स देण्याबाबतचा मागणी अहवाल अहवाल सादर करण्यात आला आहे.

रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news