पुढारी ऑनलाइन डेस्क | निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये पाच कोटी रुपयांहुन अधिक रक्कम सापडली आहे. यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान आज निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. त्यातच आता नाशिकमधील या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सकाळी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. ही कोट्यवधींची रक्कम नेमकी कोणाची आहे? पोलिसांनी ताब्यात घेतलेला नेता कोणत्या राजकीय पक्षाचा आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.