सुरगाणा(जि. नाशिक) : सरकारचे डोके फिरले आहे काय? असा संतप्त सवाल करत सर्वोच्च न्यायालयाचे काही एक म्हणणे नसतांना आदिवासी भागातील १७ संवर्ग पेसा भरती थांबवली आहे असे ताशेरे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी ओढले. नाशिक ते सापुतारा गुजरात महामार्गावर घागबारी उंबरपाडा टोल नाका येथे सकल आदिवासी जमातींच्या वतीने बेमुदत चक्का जाम आंदोलनात सहभागी होत त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.
गुजरात कडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला. यावेळी सकल आदिवासी कृती समितीचे माजी आमदार जिवा गावित, आदिवासी सेवक चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, भास्कर चौधरी, सखाराम भोये, जनार्दन भोये, चंद्रकांत वाघेरे, सुभाष चौधरी, कृष्णा चौधरी, सरोज भोये, मनोहर गायकवाड , नरेंद्र दळवी, काशिनाथ भोये, धनंजय गावित, हिरामण गावित, चंदर पवार, तुळशीदास पिठे, गणपत भोये, भाऊराव राऊत आदीसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. तर सुरगाणा शहरात नितीन पवार, संजय पवार, इंद्रजीत गावित, सुभाष चौधरी, पांडुरंग गायकवाड, भरत पवार, अशोक धुम, भास्कर जाधव यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

पेसा भरती संदर्भात जो पर्यंत सरकार चर्चेसाठी बोलावत नाही तोपर्यंत हे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कार्यालयात आदिवासींची आर्थिक पिळवणूक केली जाते. एखाद्या क्षुल्लक कामासाठी आदिवासींना गरगर फिरवले जाते. तहसील कार्यालयात साधे रेशन कार्ड, आधार कार्ड काढायला पैशाची मागणी केली जाते अशा आरोप केला. पेसा क्षेत्रात वन जमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, राज्यातील तेरा जिल्ह्यात पेसाची प्रभावी अंमलबजावणी करा, १७ संवर्ग पेसा क्षेत्रात भरती करा अशा मागण्या या आंदोलनात केल्या आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत आंदोलक घागबारी उंबरपाडा येथे ठाण मांडून रस्त्यावर बसले होते. या आंदोलनात सकाळी हजारो तरुण बेरोजगार सहभागी झाले होते. या चक्का जाम आंदोलनात तालुक्यातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. याचा प्रभाव बा-हे, उंबरठाण, पळसन, बोरगाव, पांगारणे, सुरगाणा शहरात अगदीच दिवसभर शुकशुकाट आढळून आला.