Ajit Pawar Nashik | अजित पवारांच्या 'कादवा'वारीत दडलयं काय?

चेअरमन श्रीराम शेटे यांची सदिच्छा भेट
Ajit Pawar Nashik
कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांची सदिच्छा भेटpudhari photo
Published on
Updated on
दिंडोरी : अशोक निकम

जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार दिंडोरी दौऱ्यावर आले असता त्यांनी शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांची कादवा कारखानास्थळी सदिच्छा भेट घेत कादवाच्या कारभाराचे कौतुक केले. यावेळी शेटे यांनीही अजित पवारांचा यथोचित सत्कार केला. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शेटे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या शब्दाला किंमत असल्याने भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची ही नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांचा वाढदिवसही कादवा कारखाना येथेच साजरा केला होता. त्यांच्या बॅनरवर शेटेंचा फोटो होता. तेव्हाही त्या फोटोवरुन बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार यांनी कादवाचा टॅक्स आम्ही माफ केला. भविष्यातही कारखान्यासाठी जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पवारांच्या कादवा वारीत नक्की काय दडलल हा संशोधनाचा विषय आहे.

Ajit Pawar Nashik
मला मुख्यमंत्री बनवले असते तर सगळी पार्टी आणली असती - उपमुख्यमंत्री अजित पवार

झिरावाळांच्या उमेदवारीवर दादांची चुप्पी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दिंडोरी दौऱ्यावर आले असता त्यांनी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. त्यानंतर माजी आ. धनराज महाले यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या भाषणात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ द्या असे आवाहन केले. मात्र, झिरवाळांच्या उमेदवारीवर बोलणे टाळले होते. त्यामुळे दादांची चुप्पीत काही वेगळं दडलयं का याबाबत तर्कवितर्क लावले आहे.

गोकुळ झिरवाळची भुमिकेकडे लक्ष

विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी केली होती, मात्र, झिरवाळांनी मी त्याचा बाप आहे तो माझ्या शब्दांच्या पुढे जाऊच शकत नाही असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यानंतर झालेल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला झिरवाळांच्या पत्नी आणि मुलगा दीपक उपस्थित होता. तर गोकुळ हा अनुपस्थित होता. गोकुळने आपली भूमिका अजुन स्पष्ट केली नाही. त्यामुळे झिरवाळांच्या शब्दांला गोकुळ मान देतो का? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news