File Photo
File Photo

Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून चुंचाळे दत्तनगर परिसरात परप्रांतीयांच्या गटांत झालेल्या हाणामारी प्रकरणी (Nashik Crime)  अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांच्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिहारमधील बागलपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या नातेवाइकांच्या दोन गटांत कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून दोन दिवसांपूर्वी दगडफेक करत तुफान हाणामारीची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Nashik Crime)

दरम्यान, प्रथमदर्शनी ही घटना दहशत माजविण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांना वाटले. मात्र, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार आदींसह पोलिस पथकाने या घटनेचा तपास करून जखमी पवन सिंग याच्या फिर्यादीवरून अंकेश सिंग, मिंदू राजपूत, भगवान यादव, भोला यादव, टिंकू यादव, सुमित सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

या घटनेत कैलास प्रसाद हादेखील जखमी झाला. तर दुसऱ्या गटातील मिंदू यादव याच्या फिर्यादीवरून रवि राजपूत, राजेश राजपूत, श्रीकांत सिंग, शालू सिंग, प्रेम राजपूत, विशाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी या घटनेतील १२ संशयितांना अटक केली असून, उपनिरीक्षक उत्तम सोनावणे व हवालदार कैलास चव्हाण पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news