नंदुरबार पुन्हा हादरले; भूकंपाचा धक्का की आणखी काही?

नंदुरबार पुन्हा हादरले; भूकंपाचा धक्का की आणखी काही?
Sikkim Earthquake
भूकंपाचा धक्का image source - X
Published on
Updated on

नंदुरबार : जिल्ह्यातील काही भागात शुक्रवार (दि.30) रोजी अचानकपणे प्रचंड हादरा देणारा आवाज झाला. दरम्यान, हा आवाज आणि हादरा आकाशातून उडणाऱ्या रॉकेटचा की भूकंपाचा? याविषयी वेगवेगळे तर्क विर्तक मांडले जात असून संभ्रमात टाकणारी माहिती पसरवली जात आहे.

शुक्रवार (दि.30) रोजी दुपारी एक वाजून 30 मिनिटानंतर अचानक सिलेंडर स्फोटासारखा मोठा आवाज परिसरात झाला आणि नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या आवाजासोबतच अवघे काही सेकंद जमिनीला व घराच्या भिंतीला हादरे जाणवले. नंदुरबार शहराच्या चहू बाजूच्या दहा दहा किलोमीटर अंतरावरील लांब वसाहतींमधून नागरिकांना असे जाणवले. तर अशाच प्रकारचा आवाज आणि हादरा जाणवल्याचे शहादा तळोदा तालुक्यातील नागरिकांकडून देखील सांगण्यात आले. यावरून नंदुरबार जिल्ह्याच्या बहुतांश भागात हादरा बसेल एवढा मोठा हा आवाज होता हे स्पष्ट झाले आहे; परंतु हा हादरा भूकंपाचा की रॉकेटचा यावर अद्याप शासकीय अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. याच क्षणी आकाशातून एक रॉकेट देखील उडताना दिसले असे काही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

नंदुरबार : शहादा तालुका भूकंपाने हादरला

चार वर्षापूर्वी देखील हादरे

बरोबर तीन-चार वर्षांपूर्वी सुद्धा अशाच घटना घडल्या होत्या. अक्राणी (धडगांव) तालुक्यातील दूर्गम भागात भूकंपाचे 3.2 रिश्टर स्केल धक्के बसले होते आणि तो ऑगस्ट चा महिना होता. आताही ऑगस्ट महिन्यात तशीच घटना घडली असून हा मोठा योगायोग मानला जात आहे. शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4:45 वाजता भूकंपाचा बसलेला धक्का 13.5 किमी खोलवर होता. हे ठिकाण नर्मदा नदीवरील महाकाय धरण सरदार सरोवर पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे. विशेष असे की, तत्पूर्वी मध्यप्रदेशात शनिवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी भुकंपाचे दोनदा धक्के बसले होते. मध्यप्रदेशच्या त्याच सीमेलगत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुकाही त्याचवेळी हादरला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news