नशिराबाद येथे वाघाची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपींना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 6 जणांना अटक केली होती. त्यामधील आरोपींना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे आणले असता मुलाने भेटण्याची मागणी केली. वडिलांना भेटू दिले नाही म्हणून 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने जीवन संपवल्याची घटना उघड झाली आहे. सोम रहीम पवार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीमाशुल्क विभागाने वाघाची कातडी विक्रीसाठी आणल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. हे सहा आरोपी वन विभागाच्या ताब्यात देऊन वन विभागाच्या कोठडीत आहेत. शुक्रवारी (दि.२) वन कोठडीत असलेल्या रहीम रफिक पवार यांना सोबत घेऊन त्यांचे मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा गाव गाठले.या वेळेला रहीम पवार यांचा लहान मुलगा सोम रहीम पवार हा वडिलांना भेटू द्यावे यासाठी मागणी घालत होताय मात्र त्याची मागणी वनअधिकाऱ्यांनी नाकारली यामुळे सोम पवारने घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन गळफास लावून जीवन संपवले. प्रसंगी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी हलखेडा गाव गाठून माहिती घेतली. दरम्यान हलखेडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने रहीम पवार यांच्या घराजवळ जमा झाले. सोम पवार याच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्याने लिहिले आहे की, “माझ्या बाबाला पोलिसांनी भेटू नाही दिले. म्हणून मी आत्महत्या केली.दिनांक 2/8/2024 माझे नाव : सोम रहीम पवार” असे त्याने चिठ्ठीत लिहीले आहे.ृ
या घटनेमुळे खळबळ उडाली असून वन विभागाच्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी जोर धरत आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आता वनविभागाचे प्रशासन दोषी पोलिसांवर काय कारवाई करते याकडे हलखेडा ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.त्याची आत्या भोसले यांनी खबर दिल्या भरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.