नवीन बीडिओ आले आता पारदर्शक काम होईल : आमदार चंद्रकांत पाटील

पंचायत समिती कुलूप प्रकरण

MLA Chandrakant Patil
आमदार चंद्रकांत पाटील
Published on
Updated on

जळगांव : उडवाउडवीचे उत्तर देणे, ग्रामपंचायत कडून आलेले ठराव न मंजूर करता दुसरे ठराव मंजूर करणे, लोकांकडून पैसे घेऊन काम करणे अशा अनेक तक्रारीवरून पंचायत समितीला दि. 25 रोजी कुलूप लावण्यात आले होते. बीडीओ यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी नवीन बीडीओ देण्यात आले मात्र ते उशिराने पोचल्यावरही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सत्कार करून फटाके फोडून त्याचे स्वागत केले व आता पारदर्शक काम होईल घरोघरी जाऊन काम होतील असे आपल्या शैलीत नाव न घेता टोला लगावला.

बीडच्या कामावर नाराजी दाखवत व झालेल्या बैठकीमध्ये उडवा उडवी चे उत्तर दिल्यावरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पंचायत समितीला दि. 24 रोजी टाळा लावला होता. यावरून बीडिओ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. आता त्या ठिकाणी नवीन बीडिओ यांना रुजू करण्यात आले. दि. 25 रोजी सकाळी पावणे दहा वाजेपासून पंचायत समिती या ठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील नवीन गटविकास अधिकारी यांची वाट पाहत असताना हे साडेअकरा वाजता आल्याने त्यांनी आपल्या खोचक शैलीत टोलेबाजी करीत त्यांचा सत्कार करून फटाके फोडले.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ऐकलेल्या विषयानुसार पंतप्रधान घरकुल योजनेचे टार्गेट कमी आल्याने हा संताप झालेला आहे. टार्गेट कमी आले यासाठी आपण केंद्राकडे भांडावे योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा हा मुद्दा बरोबर आहे. टारगेट कमी आले म्हणून कोणाला टार्गेट करू नये.

अजूनही स्वच्छ भारत मिशनचे बऱ्याच वर्षापासून पैसे आलेले नाही. मात्र हा नवीन पायंडा पडलेला आहे. काम नाही झाले कुलूप लावायचे ते वरिष्ठ नेते आहेत. काम न झाल्यास आता आम्ही सुद्धा कुलूप लावणार आता नवीन प्रचलित पद्धती प्रमाणे हा पांयडा पडलेला आहे. बीडिओ यांना सक्तीच्या रजेवर का पाठविले याची माहिती मिळत नाहीये. माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र माहिती मिळत नाही असेही ते म्हणाले. यापुढे प्रत्येक जण कुलूप लावून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करेल कारण ते सर्व वरतून शिफारस घेऊन आलेले आहेत आता नवीन आलेले बीडिओ हे पारदर्शक काम करतील घरोघरी जाऊन कामे होतील आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी शाळा इमारती दुरुस्त कराव्यात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news