जळगाव : शहरातील एमआयडीसी भागात जी सेक्टरमधील सागर लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि.२७) लॉजवर छापा टाकत पोलिसांनी सहा महिलांसह तीन जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी लॉज मालक व लॉज भाड्याने चालविणाऱ्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, एमआयडीसी भागात जी सेक्टरमधील सागर हॉटेल व लॉजचा मालक काही माहिलांना वेश्या गमनासाठी आणून एजंटकडून गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार त्यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेको दत्तात्रय बडगुजर, पोना विकास सातदिवे, मपोहेको सुनंदा तेली, पोहेको मुकुंदा पाटील, पोहेको रामदास कुंभार, पोकों विनोद आस्कर, पोको भरत डोके यांनी लॉजवर छापा टाकून सहा महिलांसह तीन जणांना अटक केली. यावेळी चौकशी केली असता या हॉटेलचे मालक सागर नारायण सोनवणे याचा हा लॉज असून सागर सुधाकर पाटील याने लॉज भाडयाने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.