खेडी खुर्द येथे तरूणाचा नदीत बुडून मृत्यू, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

Jalgaon News| बैलांना पाणी पाजताना गिरणा नदीत दुर्घटना
Girna River
खेडी खुर्द येथे गिरणा नदीत बुडून तरूणाचा मृत्यू झाला. Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : खेडी खुर्द येथे राहणारा 32 वर्षीय तरूण शेतकरी हा बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीत गेला होता. यावेळी त्याचा पाय घसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२७) सकाळी ११ वाजता उघडकीस आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईश्वर सोमा कोळी (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) हा आईवडील, भाऊ व वहिनी यांच्यासोबत राहतो. खेडी खुर्द शिवारातील गिरणा नदी काठावर त्यांचे शेत आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी (दि. २६) दुपारच्या सुमारास ते बैलांना पाणी पाजण्यासाठी गिरणी नदीत गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ईश्वर हा पाण्यात पडला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, दोन्ही बैल हे सायंकाळी ५ वाजता घरी आले. परंतु, ईश्वर सोबत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा रात्री उशीरापर्यंत सर्वत्र शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ११ वाजता शेत शिवारातील गिरणा नदीपात्रात ईश्वरचा मृतदेह आढळून आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मुदस्सर काझी करीत आहेत.

Girna River
जळगाव : 'हतनूर'चे 20 दरवाजे उघडले; नदीकाठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news