जळगांव : शहरातील अयोध्या नगर येथील डॉक्टर डॉ. योगेश बसेर यांना काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. क्लिनिकमध्ये मद्यप्राशन केलेल्या तरुणांकडून शुल्लक कारणासाठी डॉक्टरांना बेदम मारहाण झाली. यामध्ये डॉक्टर जबर जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना जनरल प्रॅक्टीशनसी असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
मंगळवार दि. 27 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास 8 ते 10 तरुण मद्य प्राशन करून डॉ. योगेश बसेर यांच्या दवाखान्यात आले. त्यांनी एका जखमी तरुणास मलमपट्टी करण्यासाठी आणले होते. रुग्णासोबत आलेल्या 8 ते 10 मद्यपी तरुणांनी डॉ. योगेश बसेर यांना लाथा बुक्क्यांनी तुडवत शिवीगाळ केली. त्यांच्यावर फायटर व रॉडने प्राण घातक हल्ला केला. त्यांच्या खिशातील रोख रक्कम हिसकावून नेली. दवाखान्यातील खुर्च्यांची, फर्निचर व बॅनर ची तोडफोड देखील केली.
यात डॉ. योगेश बसेर यांना डाव्या डोळ्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली असून नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे. या तरुणावर कठोर कारवाई तात्काळ करावी.