जळगाव : शहरातील गणपती नगरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग करून तिला घर सोडून निघू जा असे सांगून धमकी दिल्याची घटना रविवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात ४० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच परिसरात संशयित आरोपी योगेश प्रकाश खडके आणि जयश्री प्रकाश खडके हे राहतात. दरम्यान, रविवारी १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता संशयित आरोपी योगेश खडके याने महिलेला म्हणाला की, तू मला आवडते, त्यावर महिला जाब विचारण्यासाठी गेल्या असता तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार जयश्री प्रकाश खडके यांना सांगितला असता तिने देखील येथील घर सोडून जाण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीसात संशयित आरोपी योगेश प्रकाश खडके आणि जयश्री प्रकाश खडके दोन्ही रा. गणपती नगर, पिंप्राळा, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.